District Office nanded.jpg 
मराठवाडा

विविध निर्बंध पुढील आदेशापर्यंत राहणार कायम

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्यासाठी विविध विषयानुसार (ता.३१) मार्चपर्यंत घालण्‍यात आलेले निर्बंध (बंदी) पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्गमीत केले आहेत.

यापूर्वी ३१ मार्चपर्यंतच होते निर्बंध
साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार अधिसुचनेनुसार प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून जिल्हाधिकाऱ्यांना घोषित केले आहे. त्यानुसार नांदेड जिल्‍ह्यातील नमुद विषयनिहाय बाबींवर ता. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेशित करण्‍यात आले आहे. नांदेड जिल्‍ह्यात फौजदारी संहिता दंडप्रकियेचे कलम १४४ अन्‍वये प्रतिबंधात्‍मक आदेश पारीत करण्‍यात आला आहे. पुढील बाबींनुसार ता. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्‍यात आलेले आदेश पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.


बंद राहणाऱ्या बाबी
जिल्ह्यात बंद ठेवण्यात पुढील बाबींचा समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्‍था, खाजगी शिकवणी, अभ्‍यासिका केंद्र, शहरी हद्दी लगतच्‍या शैक्षणिक संस्था, जिल्‍हयातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्‍था, महापालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडया, चित्रपटगृहे, तरणतलाव, व्‍यायाम शाळा, नाट्यगृह, म्‍युझियम, शॉपिंग मॉल, आठवडी बाजार, जिल्‍ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाड्या, आधार केंद्र, सर्व बॅंकातून अनुदान व पिक विमा वाटप, सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्‍तनोंदणीची काम यांचा या बंदमध्ये समावेश आहे. 

हेही वाचलेच पाहिजे...अवकाळीचा पावसाचा पुन्हा कहर

बैठक, अभ्यांगतांच्या भेटीही नियंत्रित
कार्यालयातील बैठका व अभ्‍यांगतांच्‍या भेटी नियंत्रित राहतील. यापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, परिपत्रके हे या आदेशासह अमंलात राहतील. या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास संबंधिताविरुध्‍द भारतीय दंडसंहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नमूद केले आहे.

गर्दीवर हवे नियंत्रण
जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. यात एका ठिकाणी चारपेक्षा जास्त अधिक व्यक्तींनी येवू नये असे आवाहन करत आहे. परंतु नागरिक मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक एकत्र येवून गर्दी करताना दिसत आहेत. अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली अनेकांनी रस्त्यावर तसेच भाजीपाला, किराणा माल, मेडीकलवर खरेदी करताना गर्दी करत आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार वाढण्याची शक्यता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे नागरिकांनी स्व:ताहून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : भुजबळ साहेब लवकर बरे व्हा, खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT