vashi
vashi vashi
मराठवाडा

जपून जपून जाऽऽऽ रे! वाशीफाटा ते वाशी शहर रस्त्यावर खड्डेच खड्डे

नेताजी नलवडे

वाशी तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ५४ गावांमधील अनेक नागरिकांना रोज वाशी येथे विविध कामासाठी यावे लागते

वाशी (उस्मानाबाद): तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले. वाशीफाटा ते वाशी शहर चार किलोमीटरचे अतंराची अधिक दुरवस्था झाली आहे. दरम्यान, झाडाच्या फांद्यामुळे या रस्त्यावरील धोकादायक वळणावरील समोरचे वाहन दिसत नसून अपघताची शक्यता वाढली आहे. त्यामुळळे या रस्त्याने प्रवास म्हणजे ‘जपून जपून जपून जाऽऽऽ रे! पुढे धोका आहे’ असे स्वतःच स्वतःला बजावून वाहन चालकांना वाहन चालवावे लागत आहे. तालुक्यात एकूण ५४ गावे आहेत. वाशी तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ५४ गावांमधील अनेक नागरिकांना रोज वाशी येथे विविध कामासाठी यावे लागते.

वाशीफाटा ते वाशी शहर हे चार किलोमीटरचे अतंर आहे. या रस्त्यावर दिवसभर आणि रात्रीही मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा असते. या रस्त्यावर असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीजवळ वळण रस्ता आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांद्या या रस्त्याच्या दिशेने वाढलेल्या असल्याने वाहनधारकांना या ठिकाणी समोरून आलेले वाहन दिसत नाही. परिणामी, अपघाताची भीती वाढली आहे. या रस्त्यासह तालुक्यातील विविध भागातील रस्त्याचीही मोठी दुरवस्था झाली आहे. संबंधित कत्राटदराने खड्डे बुजविण्याचे दर्जेदार काम केले नाही. त्यामुळे महिनाभरात पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

होईल मोठा अपघात
वाशीफाटा ते वाशी शहर या रस्त्यावर वळण असलेल्या वळणावरील झाड्याच्या फांद्यामुळे समोरील वाहन दिसत नाही. शिवाय रस्त्यावर खड्डेही आहेत. खड्डे चुकवताना आणि समोरील वाहन दिसले नाही म्हणून या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे संबंधितांनी आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT