जालना ः भाजीपाला व फळविक्रीचे हातगाडे न लागल्याने बुधवारी मोकळा दिसणारा गांधी चमन परिसर.   
मराठवाडा

जालन्यातील पाच चौकांनी घेतला मोकळा श्वास 

उमेश वाघमारे

जालना - शहरातील पाच चौकांनी बुधवारी (ता. १७) मोकळा श्वास घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानंतर जालना शहरातील चौकांमध्ये भाजीपाला व फळविक्रेत्यांचे गाडे बुधवारी (ता. १७) दिसून आले नाहीत. 

जालना शहरातील नूतन वसाहत, गांधी चमन, भाजीमंडई बाजार चौक, महात्मा फुले मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे भाजीपाला व फळविक्री करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मंगळवारी (ता. १६) दिले होते.

या आदेशाची नगरपालिकेमार्फत तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १७) शहरातील नूतन वसाहत, गांधी चमन, भाजीमंडई बाजार चौक, महात्मा फुले मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एकही भाजीपाला व फळविक्रेत्याचा हातगाडा नगरपालिकेने लावू दिला नाही. त्यामुळे भाजीपाला व फळ खरेदीसाठी रोजच होणारी नागरिकांची गर्दी बुधवारी (ता. १७) पाहण्यास मिळाली नाही.

दरम्यान, बुधवारी भाजीपाला व फळविक्रीसाठी आझाद मैदान व घोगरे स्टेडियम येथे हातगाडे लावण्यात आले होते. 

जालन्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई 

जालना शहरातील सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता फिरणाऱ्या १२ जणांवर पोलिस प्रशासन व नगरपालिकेच्या वतीने बुधवारी (ता.१७) कारवाई केली. त्यांच्याकडून चार हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सतत हात धुणे अशा सूचना दिल्या जात आहेत. मात्र, नागरिकांकडून या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. बुधवारी (ता.१७) शहरात पोलिस प्रशासन आणि नगरपालिका यांनी संयुक्तरीत्या मोहीम राबवीत विनामास्क फिरणाऱ्या १२ जणांवर दंडात्मक कारवाई करीत चार हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व दुकानदार यांनी आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. दुकानासमोर विशिष्ट अंतरावर चुन्याने मार्किंग करून घ्यावी. दुकानात कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असेही पोलिस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT