file photo 
मराठवाडा

Video: भाजीपाला विक्रेत्यांना मिळाली हक्काची जागा : वाचा कुठे?

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः प्रभाग क्रमांक चारमध्ये उघडा महादेव मंदिराजवळील खुल्या पटागणांत नगरसेवकांच्या पुढाकाराने भाजीपाला व फळे विक्री केंद्र बुधवारी (ता.२९) सुरू करण्यात आले असून त्यामुळे सत्तरपेक्षा अधिक विक्रेत्यांना हक्काची जागा मिळाली आहे.

जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार प्रभागाच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका श्रीमती वनमाला देशमुख व श्रीमती माधुरी बुधवंत यांच्या संकल्पनेतून उघडा महादेव परिसरातील खुल्या मैदानावर परिसरातील नागरिकांसाठी भाजीपाला व फळ मार्केट उभारण्यात आले. बुधवारी (ता.२९) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पाहणी केली. या वेळी आमदार सुरेश वरपुडकर, बालाजी मंदिराचे महंत अखिलेशदास बाबाजी, बाळासाहेब देशमुख, विशाल बुधवंत , विश्वजित बुधवंत, अक्षय देशमुख, नगरसेवक चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते.

प्रतीक्षागृहाची उभारणी
या विक्री केंद्रात ७० पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आले असून त्यामुळे तात्पुरते का होईना छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना उदरनिर्वाहाचे साधन तर मिळालेच तर परिसरातील नागरिकांची भाजीपाल्याची अडचन सुद्धा दूर झालेली आहे. या ठिकाणी पिण्याचे पाण्यासह गर्दी होऊ नये म्हणून प्रतीक्षागृहदेखील उभारण्यात आले. विशेष म्हणजे नगरसेवकांनी स्वखर्चाने ही बाजारपेठ उभारली असून मंडपदेखील टाकण्यात आला आहे. शारीरिक आंतर राखण्यासाठी प्रत्येक स्टॉलला कटघरे करण्यात आलेले आहे.

भाजीपाला घरपोच देण्याचा प्रयत्न...
रस्त्यावर, महामार्गावर भाजीपाला, फळे खरेदीसाठी मोठी गर्दी होत होती. त्यामुळे शहरातील अशा जागा शोधून त्या ठिकाणी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास या प्रभागाच्या नगरसेवकांनी प्रतिसाद देत भाजीपाला केंद्र उभारून जो उपक्रम राबविला तो निश्चितच स्तुत्य आहे. नागरिकांनी या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे अनुपालन करावे. तसेच जनतेने या परिस्थितीत आतापर्यंत केले तसे सहकार्य करावे, जेणेकरून आपले ग्रीन झोनचे स्थान अबाधित राहिले व या संकटावर मात करू, असे यावेळी जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर म्हणाले. भाजीपाला घरपोच देण्याचाही प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivraj Motegaonkar Viral Video : पेपर फोडणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्या... शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल

‘जशी स्वामींची इच्छा!’ गश्मीर महाजनी देऊळ बंद 2 मध्ये दिसणार? मोहन जोशी म्हणाले...'सगळे राघव शास्त्रीबद्दल...'

LSG vs RR: ३८ चेंडूत ९३ धावा... वैभव सूर्यवंशीने वादळी खेळीसोबतच ३ मोठे विक्रमही केले; रिषभचा ८ वर्षे जुना रेकॉर्डही मोडला

Swimming Record: शेतकरी कुटुंबातील कन्येची भरारी! आंबेगावची १३ वर्षीय विधी भोरची ऐतिहासिक कामगिरी; ४२ किमी जलतरण ७ तासांत पूर्ण..

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

SCROLL FOR NEXT