tomato 
मराठवाडा

टोमॅटोसह भाजीपाला जातोय सुकून, कशामुळे ते वाचा... 

शिवाजी गिरी

केंद्रा बुद्रुक ः सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक व परिसरात कोरोनाच्या धास्तीने मजूर शेतात येत नसल्याने भाजीपाल्यासह टोमॅटोचे पीक तोडणीअभावी जागेवरच सुकून जात असल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत.

केंद्रा बुद्रुकसह कहाकर बुद्रुक, गोंधनखेडा, जामठी बुद्रुक, बटवाडी, वरखेडा, ताकतोडा येथील अल्पभूधारक असलेले शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्यावर भाजीपाल्याची लागवड केली आहे. दरवर्षी भाजीपाल्याच्या विक्रीतून घरसंसारात त्‍याची चांगली मदत मिळते. या वर्षीदेखील या गावात बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. यात टोमॅटो, वांगी, भेंडी, कांदे, कोथिंबीर, चवळी, कांदे, कोबी, पालक आदींचा समावेश आहे.

शेतीतील कामे खोळबंली
मागच्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची नियमित विक्रीदेखील सुरू झाली होती. मात्र, ऐन भाजीपाला विक्रीला येताच कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घाण्यास सुरवात केल्याने संचारबंदी सुरू झाल्याने शहरात जाणे बंद झाले आहे. गावातदेखील फिरणे बंद झाले वाहने सीमा बंद झाल्याने प्रवास थांबला आहे. तसेच एका ठिकाणी पाच व्यक्‍ती थांबू नका, अशा वारंवार गावात स्‍पीकरवरून सूचना केल्या जात आहेत. त्‍यामुळे शेतीतील कामे खोळबंली आहेत. शेतात कोणी मजूर येण्यास तयार नाही. त्‍यामुळे गावातील शेतकऱ्यांचा भाजीपाला सध्या शेतातच तोडणीअभावी सुकून जात आहे. त्‍याचा फटका या अल्‍पभूधारक शेतकऱ्यांना बसला आहे. 

पावसानेदेखील भाजीपाल्याचे नुकसान
काही शेतकऱ्यांनी कुटुंबीयांसह शेतात तोडून आणलेल्या भाजीपाला गावात घरपोच देणे सुरू आहे. मात्र, गावात अनेक शेतकऱ्यांकडे भाजीपाला असल्याने त्‍याला कोणी घेण्यास तयार नसल्याने भाजीपाला उत्‍पादकांनी हा भाजीपाला जागेवर ठेवल्याने तो सुकून जात आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या पावसानेदेखील भाजीपाल्याचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

संचारबंदी व कोरोनाची धास्‍ती
पंधरा गुंठ्यांत भेंडी, टोमॅटोची लागवड केली आहे. ते दोन्हीही तोडणीस आले आहेत. मात्र, संचारबंदी व कोरोनाच्या धास्‍तीने त्‍याची तोडणी बंद केल्याने ते जागेवरच सुकून जात आहेत.
-हरी कोरडे, शेतकरी, बटवाडी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT