pull 
मराठवाडा

वाहनधारकांचा ‘या’ कामामुळे वाचणार वेळ...

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः शहरातील खटकाळी भागातून जाणाऱ्या रेल्‍वे गेटजवळ उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या पुलामुळे आता येथून जाणाऱ्या राज्यमार्गावरील वाहनधारकांची होत असलेली गैरसोय लवकरच दुर होणार आहे.

हिंगोली शहरातील खटकाळी जवळ रेल्‍वे गेट क्रमांक १४४ आहे. येथून हैदराबाद हे अकोला जाणारा राष्‍ट्रीय महामार्ग आहे. रेल्‍वे जात असताना वारंवार रेल्‍वेगेट बंद करावे लागत असल्याने अनेक वाहनधारकांची गैरसोय होत होती. यामुळे येथे उड्डाण पुल उभारण्याची मागणी प्रवाशांसह, रेल्‍वे समिती, प्रवाशी संघटनेसह लोकप्रतिनिधी व पत्रकारांनी केली होती. त्या मागणीला आता काही अंशी यश आले आहे. 

कामासाठी ३६ कोटी रुपये निधी
येथील गरज ओळखून येथे पुलाला मंजुरी मिळाली. त्‍यानंतर भुमीपरिक्षण करून वळण रस्‍ता तयार केल्यानंतर हा पूल उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्‍यासाठी महाराष्‍ट्र रेल इन्क्रास्‍ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एमआयआरडी) तर्फे ३६ कोटी रुपये निधीद्वारे हे काम केले जात आहे. सध्या येथे कॉलम भरून ते उभे केले आहेत. या पुलाचे का पुर्ण झाल्यावर येथे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीला दिलासा मिळणार असल्याने वाहनधारकासह प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा, सचिव जेठानंद नेनवाणी, चंद्रकांत निलावार, गणेश साहु, डॉ. विजय निलावार, शोएब वासेसा यांच्यासह नागरिकांतून समाधान मानले जात आहे.

रेल्‍वे दुहेरीकरणाचे काम लवकर होणार
अकोला ते पूर्णा जाणाऱ्या रेल्‍वे मार्गाचे लवकरच दुहेरीकरणाचे काम होणार आहे. यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर रेल्‍वे गाड्या धावणार असल्याने त्‍याचा प्रवाशांना लाभ होणार आहे. अकोला ते पुर्णा रेल्‍वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम होवून अकरा वर्ष झाले आहेत. दक्षिण, उत्तर, पश्चिम अशा चारशे किलोमीटर जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. या मार्गावर होणाऱ्या प्रवासी व मालवाहतुकीमुळे पैशासह इंधनाची देखील बचत होणार आहे. तसेच अकोला, अकोट व खंडवा मार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर अनेक गाड्या या मार्गावरून धावणार आहेत. या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी दक्षिण मध्य रेल्‍वेकडे अंतिम सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश रेल्‍वे बोर्डातर्फे देण्यात आल्याची माहिती रेल्‍वे प्रशासनाकडून मिळाली आहे. यासाठी निधी देखील उपलब्ध झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : पहिला डाव संपला, MS Dhoni मैदानावर आला... CSK च्या खेळाडूंनी जे केलं, ते पाहून सारेच Emotional... 'माही'ची निवृत्ती?

मुंबईकरांसाठी मोठी आनंदवार्ता! भायखळा झूमध्ये ‘जंगलचा राजा’ लवकरच दिसणार; गुजरातकडून तत्त्वतः हिरवा कंदील

Meta Layoffs: मेटामध्ये छाटणी! कर्मचारी चवताळले; रागात ऑफिस आणि स्नॅक्स काउंटरमधील सामान लुटले, विचित्र किस्सा चर्चेत

Mumbai: सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयोग आक्रमक, ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

SCROLL FOR NEXT