download
download 
मराठवाडा

वळण रस्त्याने घेतला युवकाचा बळी

सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी ः उमराफाटा-नांदापूर मार्गावर पुलाच्या बांधकामाला भरधाव दुचाकी धडकून एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.आठ) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वारंगा मसाई गावाजवळ घडली आहे. नांदापूर येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी हिंगोली येथील सूरज पंडितराव दळवे (वय १७), वैभव केशवराव बोरकर (वय १७) (रा. नांदापूर, हल्ली मुक्काम हिंगोली), ऋत्‍विक वाघमारे (वय १७, रा. हिंगोली) हे हिंगोली येथील मित्रांसमवेत नांदापूरला गेले होते. नांदापूर येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळच्या सुमारास हिंगोलीकडे दुचाकीवर ट्रिपल सीट निघाले होते. 

वळणरस्त्यावर यापुर्वी छोटे-मोठे अपघात
सोडेगाव फाटा ते वसमत या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गावरील असलेल्या छोट्या-मोठ्या पुलांच्या बांधकामाकरिता या मार्ग वळणरस्ते काढण्यात आले आहेत. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अनेक ठिकाणी पुलाच्या बांधकामास जवळून काढलेल्या वळणरस्ता लक्षात येत नाही, अशी स्थिती आहे. वारंगा वसई येथील फुलाच्या वळणरस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत.
 
हेही वाचा - बीड जिल्ह्यात चौघे ठार, असे घडले अपघात....

दुचाकीवरील दोघे गंभीर
नांदापूर हिंगोलीकडे येणाऱ्या ट्रिपल सीट मोटरसायकल चालवणाऱ्या युवकास हा वळणरस्ता लक्षात आला नाही. भरधाव वेगाने येणारी मोटरसायकल सरळ जावून पुलाला धडकली. या धडकेत गाडी चालविणारा ऋत्‍विक वाघमारे हा जागीच ठार झाला, तर मोटारसायकलवर बसलेले सूरज दळवे व वैभव बोरकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

ऑटोचालकाने केली युवकांना मदत
या मार्गावरून जात असलेल्या एका ऑटोचालकाला अपघात लक्षात आल्यानंतर ऑटोचालकाने एकट्याने दोघाही गंभीर युवकांना आपल्या ऑटोत टाकून कळमनुरी येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत घटनेची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा मुलगीर हे घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयात गणेश सूर्यवंशी, शिवाजी पवार, निरंजन नलवार हे दाखल झाले. जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले. 

सेवानिवृत्ताने पेन्शन उचलली अन् ती चोरट्याने लांबविली 
हिंगोली ः येथील एसबीआय बँकेत एका सेवानिवृत्त शिक्षकाचे दहा हजार रुपये गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लांबविल्याची घटना घडली असून या बाबत बुधवारी (ता. आठ) गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एसबीआय बँकेत मंगळवारी सेवानिवृत्त शिक्षक सीताराम तुकाराम वाघ (रा. गवळीपुरा) यांनी दहा हजार रुपये पेन्शन उचलून घेतल्यानंतर जवळच असलेल्या भारतीय स्टेट बँकेत आपल्या पत्नीसह काही कामानिमित्त दुपारी दीडच्या दरम्यान गेले होते. मंगळवारी बँकेमध्ये ग्राहकांची गर्दी अधिक होती. दरम्यान, सीताराम वाघ यांच्या पिशवीमधील दहा हजार रुपये चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लांबविले. बँकेतील कामकाज झाल्यानंतर पिशवीतील रक्कम त्यांच्या निदर्शनास आली नसल्याने बँकेचे व्यवस्थापक व सुरक्षारक्षकाला या बाबतची माहिती दिली. मात्र, रकमेचा काही पत्ता लागला नाही. या बाबत सीताराम वाघ यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT