Pollice1 
मराठवाडा

VIDEO - मोबाईल लोकेशन अन् वापरलेल्या वाहनामुळे चोरट्यांचा डाव फसला

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः गंगाखेड येथे गुरुवारी (ता. २०) झालेल्या मोबाईलचोरी प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत मुद्देमालासह चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश आले.

गंगाखेड येथील कृष्णा मोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस ही मोबाईल शॉपी गुरुवारी (ता.२०) रात्री चोरट्यांनी फोडून १२ ते १३ लाख रुपयांचे मोबाईल, लॅपटॉप लांबविले. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात सुनील तुकाराम अय्या यांनी फिर्याद दाखल केली. घटनेची माहिती समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे हे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, किशोर चव्हाण, राजेश आगाशे, संजय शेळके यांच्यासह घटनास्थळी रवाना झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा, गंगाखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लांजिले यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक श्री. मोरे यांनी एक पथक सिल्लोडकडे रवाना करून तीन आरोपींसह मुद्देमाल ताब्यात घेतला.

यापूर्वीच्या गुन्ह्यातील वाहन वापरल्याचा संशय
गंगाखेड येथे गेल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करतानाच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका चोरट्याची हालचाल व शरीरयष्टीवरून तो अकबर ऊर्फ चोरबा हाच असल्याची खात्री श्री. मोरे यांना झाली. या चोरट्यांनी परभणी शहरातील नानलपेठ व कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केले होते व त्यास ताब्यात घेण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे हा चोरटा स्वतःची कार (एमएच ०४ - एफए ८१४६) वापरत असल्याचेही मागील गुन्ह्यातून सिद्ध झाले होते. त्यामुळे यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांत वाहनासह त्याचे फोटो स्थानिक गुन्हे शाखेकडे असल्याने चोरटे नक्की मिळतील याची अधिकारी, कर्मचाऱ्यांना खात्री झाली होती. शिवाय, चोरट्यांनी चोरून नेलेल्या मोबाईलसह संपूर्ण माहिती या पथकाने जमा केली.

मोबाईलच्या तांत्रिक माहितीवरून केली नाकाबंदी
आयएमईआय नबंर, मोबाईल नंबर घेतले. त्याशिवाय चोरट्यांनी मोबाईलमध्ये रिचार्ज करण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईलही लांबविला होता. त्यामुळे त्या मोबाईलच्या तांत्रिक माहितीवरून चोरटे भोकरदन - सिल्लोड रोडवर करंजाळा साबळे (ता. भोकरदन) या रस्त्यावर सिल्लोड मार्गे जात असल्याचे समजल्याने पोलिस निरीक्षक श्री. मोरे यांनी औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेसह सिल्लोड पोलिसांशी संपर्क साधत चोरट्यांचे वर्णन, फोटो, वाहन क्रमांक आदी माहिती दिली. त्यावरून सिल्लोड येथील फौजदार बालाजी ढिगारे व अन्य पोलिसांशी सातत्याने मोबाईलद्वारे संपर्कात होते. दरम्यान, सिल्लोड पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून नाकाबंदी केली. 

२५ लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात 
अकबर खान हबीब खान (रा. मालेराव पोलिस स्टेशनसमोर, मालेगाव, जि. नाशिक), अफसर खान हबीब खान (रा. क्रांतीनगर, महात्मा फुले हायस्कूलजवळ, परभणी), सय्यद हुसैन सय्यद हबीब (रा. शब्बीरनगर, मालेगाव, जि. नाशिक) हे वाहन (क्र. एमएच ०४ एफए ८१४६) मधून सिल्लोडहून मालेगावकडे जाताना एकता पेट्रोलपंपासमोर सिल्लोड पोलिसांना सापडले. या चोरट्यांकडून वाहनासह चोरीस गेलेले सर्व मोबाईल, असा एकूण २५ लाख ५५ हजार ६६६ रुपयांचा मुद्देमाल सिल्लोड पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर परभणी पोलिसांना या बाबत माहिती देण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT