नांदेड महापालिकेतर्फे निराधार, गरजूंसाठी मदतीचा हात
नांदेड महापालिकेतर्फे निराधार, गरजूंसाठी मदतीचा हात 
मराठवाडा

Video - नांदेड महापालिकेतर्फे निराधार, गरजूंसाठी मदतीचा हात

अभय कुळकजाईकर
नांदेड - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घरीच राहावे तसेच घरातच आगामी सण, उत्सव, जयंती साजरी करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (ता. दहा) गरजूंना अन्नदानही करण्यात आले. येत्या ता. १४ एप्रिलपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
महापालिकेत शुक्रवारी दुपारी दोन वाजता महापौर दीक्षा धबाले, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, विलास धबाले, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, विलास भोसीकर, सुधीर इंगोले, शुभम क्यातमवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन आदी उपस्थित होते.

हेही वाचा - अमेरिकेतील क्रांती पाटील यांनाही वाटतेय मराठवाड्याची काळजी...

अन्नदान वाटपाचा निर्णय
या बैठकीत आरोग्य सुविधा, स्वच्छता, साफसफाई तसेच पाणीपुरवठ्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमित्त अन्नदान वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारपासून ता. १४ एप्रिल डॉ. आंबेडकर जयंतीपर्यंत अन्नदान वाटप करण्यास सुरवात झाली. यावेळी गरजू, निराधार नागरिकांना तसेच स्वच्छता व साफसफाई, आरोग्यसेवा, पोलिस सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अन्नदान करण्यात आले असल्याची माहिती महापौर धबाले यांनी दिली. नागरिकांनीदेखील शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि विनाकारण रस्त्यावर येऊन गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

घरीच जयंती साजरी करावी
आंबेडकर जयंतीच्या दिवशी फक्त महापौर, आयुक्त आणि इतर दोघेजण उपस्थित राहतील व अभिवादन करतील. इतरांनी गर्दी करू नये आणि आपापल्या घरी जयंती साजरी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व गर्दी करू नये. भाजीपाला, किराणा यासाठी त्या त्या भागातील दुकाने आणि त्यांचे मोबाइल क्रमांक दिले आहेत. अत्यावश्‍यक असेल तरच घराबाहेर पडा व सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

हेही वाचलेच पाहिजे - कोरोनाविरूद्धच्या लढाईत चिखलीकर सरसावले

बापूराव गजभारे यांचे आवाहन...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी असल्यामुळे नागरिक लॉकडाऊनमध्ये आहेत. ता. १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या प्रसंगी रेल्वेस्थानकासमोरील पुतळ्याला फक्त प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या वतीने अभिवादन करण्यात यावे. इतर सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका प्रतिनिधींनी आपआपल्या घरी जयंती साजरी करावी व संसर्ग टाळावा आणि शिष्टाचाराचे पालन करावे तसेच डॉ. आंबेडकर अनुयायांनी कोरोनावर मात करण्यासाठी शिस्त दाखवावी, असे आवाहन पीआरपीचे राज्य उपाध्यक्ष नगरसेवक बापूराव गजभारे यांनी केले आहे. आपण स्वतः परिवाराचे सोबत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घरीच जयंती साजरी करणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले. कोरोनाचे संकट गेल्यानंतर अनुयायांनी प्रशासनाकडून परवानगी घेऊन जयंतीनिमित्त सार्वजनिक उत्सवाचे आयोजन करावे, असे ते म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT