Nanded Photo 
मराठवाडा

Video : नांदेडकरांच्या आरोग्यासाठी पोलिसांची कसरत

शिवचरण वावळे

नांदेड : दिवसेंदिवस ‘कोरोना’चे संकट गडद होत आहे. त्यामुळे १४ एप्रिल २०२० नंतर देशात पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता गृह विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. तरी, देखील नांदेडकरांना काही केल्या घरत बसवेनासे झाले आहे.

एकिकडे पोलीस प्रशासन लोकांना घरी बसवण्यासाठी हात जोडून विनंती करत आहे. तरी देखील शहरातील अनेक नागरीक दवाखाण्याच्या जुन्या फाईल्स घेऊन असंख्य नागरीक गाडीवर बसवून रुग्णालयात जाण्याचा बाहणा करत शहरातील रस्त्यावर मार्गस्थ होताना दिसत आहे. विसेष म्हणजे शहरातील रस्त्यावरुन फिरताना दिसणाऱ्या नागरिकांमध्ये तरुणांची संख्या ही सर्वाधिक दिसून येत आहेत. त्यांच्याकडे रुग्णालयातील जुनी फाईल हमखास आढळुन येत आहे. एकंदरीतच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरातील रस्‍त्यावर संचारबंदीच्या काळातही दररोज प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. परिणामी त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागत असल्याचे वास्तव आहे.

शुक्रवारी (ता.१० एप्रिल २०२०) शहरातील राज कारॅर्नर, वर्कशॉप आणि आयटीआय चौक दुचाकी व चारचाकी वाहनांनी गजबजुन गेले होते. त्यांना हटविण्यासाठी पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली. सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत आरोग्य, बँक, सफाई कामगार, महावितरण, प्रसार माध्यमे अशा विविध विभागातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी मोकळीक देण्यात आली आहे.

परंतु, त्यानंतर देखील अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण रुग्णालय, औषधी दुकान व इतर सेवेच्या नावाखाली घरबाहेर पडत आहेत. मागील आठ दिवसांपासून पोलीस कर्मचारी दिवसरात्र रस्त्यावर असले तरी, रुग्णालयाचे नाव सांगितले किंवा जुनी रुग्णालयाची फाईल दाखवली की, पोलिसांनाही काहीच करता नाहीत. नेमक्या या एकाच गोष्टीचा फायदा घेऊन नांदेडकर बिनधास्तपणे फिरत आहेत.

नांगरिकांची ही बहाणेबाजी व बेजबाबदारपणा पोलीसांच्या लक्षात येत असला तरी, कुणावरही हात उगारायचा नाही. असे वरिष्ठांकडून स्पष्ट आदेश दिलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांची गर्दी बघणे वा फारतर त्यांना फाईन लावण्याशिवाय सध्यातरी पोलीसांच्या हाती काहीच नाही. रस्त्यावरील गर्दी बघुन ‘तुम्हाला कोरोनाची भीती का वाटत नाही. आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत ना. तुम्ही सुरक्षित घरी बसा’ असे आवाहन देखील पोलिस करत आहेत. मात्र पोलीसांच्या कुठल्याच आवाहनाला नांदेडकर प्रतिसाद देत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

घरात बसणेच योग्य
सर्व जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण सापडत असून, नांदेड जिल्ह्यात अद्यापही सुरक्षित आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कोरोनाला हरवायचे असेल तर नांदेडमधील सर्व नागरिकांनी घरातच बसणे आवश्‍यक आहे. विनाकारण रस्त्यावर फिरायला नाही पाहिजे.
- डॉ. अविनाश देशपांडे (भावसार चौक, नांदेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT