Nanded Photo 
मराठवाडा

Video : ‘तो’ सापडला...मग काय...झाली की सुरु पळापळ  

शिवचरण वावळे

नांदेड : महापालिकेच्या हद्दीत रविवारी (ता.२६ एप्रिल २०२०) रात्री उशीरा अबचलनगरात दुसरा कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावून अबचलनर पूर्णतः सील करुन त्या भागात सॅनेटायझरची फवारणी करण्याच्या सूचना दिल्या. मग काय, सोमवारी (ता.२७) सकाळी सर्व अधिकाऱ्यांची झाली ना पळापळ सुरु.  

बुधवारी (ता.२२ एप्रिल २०२०) जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर अजून किती ‘कोरोना’ बाधित रुग्ण सापडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु चार दिवस झाले तरी, एकही कोरोना रुग्ण आढळुन आला नव्हता, त्यामुळे आता कोरोनाची ही साखळी इथेच थांबली असे वाटत असतानाच रविवारी अबचलनगराताली एका ४४ वर्षीय संशयित व्यक्तीचा आहवाल पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणा पुन्हा खडबडुन जागी झाली.

महापालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण सुरु
बुधवारी पीरबुऱ्हाण भागात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने या परीसरास लागुन असलेला तीन किलो मीटरचा परीसर सील करण्यात आला होता. त्यानंतर या भागात एका दिवसात दहा हजारापेक्षा अधिक नागरीकांची घरोघरी जाऊन थर्मल मशिनद्वारे टेंमपरेचरची तपासणी केली. तसेच या भागामध्ये महापालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरणासाठी फावरणी केली.  विशेष म्हणजे कोरोना रुग्णाच्या घरातील आठ व सहवासातील ८० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली; मात्र त्यांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अबचलनगर कंटेन्मेंट झोन
रविवारी सापडलेल्या या कोरोना रुग्णाच्या परीवारातील १२ ते १३ व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्या रुग्णावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. नांदेड शहरातील अबचलनगर हा भाग कंटेन्मेंट झोन (अटकाव) म्‍हणून सील करण्यात आला आहे. या सील करण्यात आलेल्या भागातील नागरिकांनी घरातच रहावे. या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहेत. 

अत्यावश्यक सेवेसाठीत बाहेर पडा
जनतेने घाबरुन न जाता, प्रशासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे आणि अत्‍यंत आवश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडु नये. घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी नांदेड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT