कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रवनातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केलेली लोकवर्गणी.  
मराठवाडा

हरिनाम सप्ताहाची वर्गणी मुख्यमंत्री सहायता निधीला 

सुभाष बिडे

घनसावंगी,(जि. जालना) - रवना येथील अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त करण्यात आलेली लोकवर्गणी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने उद्‍भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली. याबद्दल गावकऱ्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. 

रवना हे सोळाशे लोकवस्तीचे गाव आहे. येथे रामनवमी ते हनुमान जयंतीदरम्यान येथील हनुमान मंदिर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात कीर्तन, जागर, हरिपाठ, विष्णुसहस्त्रनाम, श्री ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.  भरगच्च कार्यक्रम होतात. या सप्ताहाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.

या सप्ताहात नियमित जेवणाच्या पंगती व या सप्ताहाचा सर्व खर्च गावकरी लोकवर्गणीतून करतात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदा या सप्ताहाचे नियोजन मागील दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होते. यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे देशाबरोबर राज्यात परिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले. त्यासाठी उपाययोजना म्हणून लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली.

त्यामुळे रवना येथील अखंड हरिनाम सप्ताह नाइलाजाने रद्द करण्यात आला. संचारबंदी, जमावबंदी अणि लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थ, व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ही बाब लक्षात घेत रवना येथील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतील ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहेत. 

रवना येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे होतात; परंतु यंदा कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत. शेतकरी, शेतमजूर व नागरिक यांच्यासह इतरांवर उद्‍भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सप्ताहाच्या लोकवर्गणीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यावर जमा केली आहे. 
- मारुतीबाबा महाराज आगरकर, 
ग्रामस्थ, रवना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT