वसमतच्या खुतमापूरला शुध्द पाणी मिळणार
वसमतच्या खुतमापूरला शुध्द पाणी मिळणार 
मराठवाडा

वसमतच्या खाजमापूरवाडी येथे गावकऱ्यांना मिळणार शुद्ध पाणी

पंजाब नवघरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत तालुक्यातील दिग्रस खुर्द अंतर्गत खाजमापूरवाडी येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून उभारण्यात आलेल्या पाच लाख लिटर पाणी साठवण क्षमतेच्या टाकीतून गावकऱ्यांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे. झालेल्या कामाची जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा यांनी पाहणी केली.

तालुक्यातील खाजमापूरवाडी येथे गावकऱ्यांना मागील काही वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दरवर्षी गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ लागली होती. उन्हाळ्यामध्ये गावात टंचाई उपाय योजना अंतर्गत विंधन विहीर अधिग्रहण तर अनेक वेळा टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे.

हेही वाचा - रेडिओ खगोलशास्त्रातील संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग

दरम्यान आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून गावात मेटॅलिक ॲल्युमिनियम टाकी उभारण्यात आली आहे. सुमारे पाच लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीमध्ये रुफ वॉटर हार्वेस्टिंगचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर या टाकीच्या बाजूला असलेल्या एका छोट्या टाकीतून पाणी शुद्धीकरण केले जाणार आहे. त्यानंतर हे पाणी गावकर्‍यांना पिण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहे.

दरम्यान बुधवारी (ता. नऊ) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लाडे, तहसीलदार अरविंद बोलंगे, उपअभियंता श्री. कुंभारीकर, श्री रुमाले, सहाय्यक गटविकास अधिकारी बाबूलाल शिंदे, अभिजीत लोंढे, सरपंच रामू दळवी, ग्रामसेवक श्रीमती जताळे यांची उपस्थिती होती. यावेळी अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून कामाची पाहणी केली.

येथे क्लिक करा - कोरोनाकाळात प्रत्येकाने कोरोनाशी संबंधित उद्योग-व्यवसायात गुंतवणूक केली आहे. परंतु, यासाठी लागणाऱ्या परवानग्या न काढता नियमांची पायमल्ली केली आहे.

त्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधून कोविडच्या काळात काय खबरदारी घेतली पाहिजे याची माहिती दिली. तसेच प्रत्येक गावकऱ्यांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी गावात वृक्ष लागवड केली. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT