संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

शेतातून आता गावाकडे घरवापसी 

विशाल अस्वार

वालसावंगी (जि.जालना) - मागील दोन-अडीच महिन्यांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली व आपल्या कुटुंबाची काळजी म्हणून अनेक कुटुंबांनी गाव सोडून शेतात वास्तव्य केले. काहींनी ताडपत्रीत, तर काहींनी पत्राच्या शेडमध्ये, तर काहींनी अगदी गुरांच्या गोठ्यात संसार थाटला होता. आता पावसाळ्यामुळे गैरसोय नको म्हणून शेतातून गावाकडे घरवापसी सुरू झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये कुणाचा संपर्क येऊ नये, आपल्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून अनेकांनी आपले बाडबिस्तार गुंडाळून दोन महिन्यांचा किराणा भरून शेतात वास्तव्याला गेले होते. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव अगदी कमी होता.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. खबरदारी घेण्याची गरज असताना ही कुटुंबे गावात पुन्हा येत आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला असून, शेतामध्ये पक्की घरे राहायला नाहीत. पावसात जागोजागी पाणी गळतीची शक्यता शिवाय भौतिक सुविधांचा अभाव अशातच वादळ वारे येण्याची शक्यता यामुळे लहानथोर मंडळींसह शेतात राहणे मोठे जोखमीचे काम आहे. पावसाळ्यात शेतात राहणे धोक्याचे असल्याने खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी घराचा रस्‍ता धरला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे कंपनीत काम करणारे युवक गावाकडे परतले होते. आता मात्र जवळपास सर्वच कंपन्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. युवक पुन्हा कंपनीत जाण्यासाठी शहरांकडे रवाना होत आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी मी माझ्या कुटुंबासमवेत शेतात राहायला गेलो होतो. दोन महिने शेतात आनंदाने राहिलो आता मात्र पावसाळ्यात शेतात राहणे कठीण आहे. शिवाय आरोग्याचा प्रश्न उद्भवला तर गावात पावसात वेळेवर येणे कठीण होईल. त्यामुळे गावात राहण्याचा निर्णय घेतला आहे. 
- संजय वाघ, ग्रामस्‍थ 

मी पुण्यात नामांकित कंपनीत कामाला आहे. पुण्यात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव झाल्याने मी गावाकडे परत आलो होतो. जवळपास दोन महिने मी घरी होतो. आता मात्र कंपनी पुन्हा सुरू झाल्याने मला पुन्हा पुणे गाठावे लागत आहे. कष्टाने ही नोकरी मला मिळाली असून, ती टिकवून ठेवणे माझे कर्तव्य आहे. आता कोरोनाची सवय करावीच लागणार आहे. 
- सुनील गारोडी, युवक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT