फोटो 
मराठवाडा

घरीच थांबा... कोरोनाला पळवा- खा. चिखलीकर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषीत करुन जमावबंदीचे आदेश दिले आहेत. देशासह राज्यात फैलावणारा कोरोना आपल्याला परतवायचा असून नागरिकांनी घरीच थांबावे, अशी कळकळीची विनंती नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

कोरोना विषाणूजन्य आजारामुळे जग, देश राज्यावर मोठे संकट आले आहे. देश व राज्यावरील कोरोनाचे संकट टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी रविवारी पुकारलेल्या जनता कर्म्युला अभुतपूर्व प्रतिसाद दिला. येणारे काही दिवस गडद संकटाचे असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. अत्यंत महत्वाचे जसे दवाखाना किंवा जिवानावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडावे, वेळोवेळी हाथ धुवावे, प्रशासनाकडून देण्यात येणा-या सूचनांचे पालन करावे व घरीच थांबून कोरोनाला पळवावे, अशी विनंती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

प्रशासनाच्या सुचनाचे पालन करा 

मी सद्या नांदेडलाच असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रशासन अतिशय चांगल्या पध्दतीने काम करत आहे. आपणही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

महावितरणच्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल 

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

सोमवार (ता. २३) मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्याची सूचना त्यांनी दिल्यात. या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही. तथापी महावितरणच्या वेबसाईटवर बिले उपलब्ध करून देण्यात यावी, असेही त्यांनी आदेश दिले आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर बिलासंबंधीचे एसएमएस संदेश पाठविण्यात येणार आहे.

स्वतःची योग्य काळजी घेऊन निवारण करावे

या कालावधीत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे व ग्राहकांच्या विजेबाबतच्या तक्रारी स्वतःची योग्य काळजी घेऊन निवारण करावे, अशा सूचना डॉ. राऊत यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या आहेत.

महावितरणचे काम आॅनलाईनद्वारे करावे

कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रात मर्यादीत मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे आपली तक्रार टोलफ्री नंबरवर नोंदविण्यासाठी विलंब लागू शकतो. आपण आपल्या वीजपुरवठ्याबाबतच्या तक्रारी महावितरण पोर्टल व मोबाइल अॅपद्वारे नोंदवाव्यात, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे. या आवाहनाला विज ग्राहकांनी प्रतिसाद देऊन महावितरणचे काम आॅनलाईनद्वारे करावे अशी अपेक्षा मुख्य अभियंता दत्तात्र्य पडलवार यांनी केली आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT