पैठण - झपाट्याने वाढत चाललेला जायकवाडी धरणातील पाणी साठा. 
मराठवाडा

मराठवाड्यातील धरणांत पाण्याची आवक, 'जायकवाडी'चा जलसाठा वाढतोय

मधुकर कांबळे

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील सीना कोळेगाव वगळता मराठवाड्यातील मोठ्या सर्वच धरणांत (Dams In Marathwada) पाण्याची आवक सुरू आहे. सर्वाधिक वाढ नांदेडच्या ‘विष्णुपुरी’मध्ये आहे. त्यामुळे या धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात आठवडाभरात १७ दशलक्ष घनमीटर पाणी वाढले. मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतील जलसाठ्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत २१० दशलक्ष घनमीटरने वाढ होऊन तो २५६५ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. जायकवाडी (Jayakwadi Dam) धरणात शुक्रवार (ता. २३) अखेर ७७५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. (water incoming starts in all marathwada region dams glp88)

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील येलदरीत ५६३, निम्न दुधनात २०१, विष्णुपुरी ६१, निम्न मनारमध्ये ११३, ऊर्ध्व पेनगंगा ६१०, हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वरमध्ये ५६, बीड जिल्ह्यातील माजलगाव ९५, मांजरा ३९, उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा धरणात ५२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातीलच सीना कोळेगावमध्ये अजूनही उपयुक्त साठा झालेला नाही.

३१ लघुप्रकल्प कोरडेच

२३ जुलैअखेर मराठवाड्यातील ७५३ पैकी ३१ लघुप्रकल्प कोरडे आहेत. त्यात लातूर (Latur) जिल्ह्यातील ९, उस्मानाबाद ७, बीड ८ तर औरंगाबादमधील ७ लघुप्रकल्पांचा समावेश आहे. आठही जिल्ह्यांतील जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या लघुप्रकल्पांची संख्या २२२ पर्यंत आहे. दुसरीकडे ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा असलेल्या लघुप्रकल्पांची संख्या ८१ झाली आहे. ११ मध्यम प्रकल्पात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांची संख्या ९ असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT