aundha nagnath panitanchai 
मराठवाडा

हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ( जि. हिंगोली) : तालुक्यातील बहुतांश गावात पाणीटंचाई जाणवत असून गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. तालुक्‍यातील तीन गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. काळापाणी तांडा येथे तर भिषण पाणीटंचाई जाणवत असून पाण्याचा टँकर येतात पाणी घेण्यासाठी झुबंड उडत आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कामात व्यस्त आहे. इकडे अनेक गावातील गावकऱ्यांना घागरभर पाण्यासाठी लहान मुले व महिलांनासह चौफेर उन्हात पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावांत प्रशासनातर्फे टॅंकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी लोकसंख्येंच्या तुलनेत हे पाणी कमी पडत आहे. 

चार तांड्यावर टँकरद्वारे पाणी पुरवठा

सध्या तालुक्‍यातील देवाळा, तामटी तांडा, जलालदाभा, पाझरतांडा, देवाळा तर्फे लाख, सावरखेडा, भोसी, जांभळी तांडा या गावांत विहीरीचे अधिग्रहन केले आहे. दोन गावांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तसेच काळापाणी तांडा, रेवनसिंग तांडा, सेवादास तांडा व संघनाईक तांडा या चार तांड्यावर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड

दोन गावे प्रस्तावित आहेत. काही गावांचे प्रस्ताव आल्यास स्थळ पंचनामा करून २४ तासांच्या आत प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी जगदीश साहू यांनी दिली. दरम्यान, या गावांत दररोज टॅंकरची एकच फेरी येत असल्याने गावात टँकर येतात पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडत आहे. त्यामुळे सोशल डिस्‍टन्सिंगचा फज्जा उडत आहे. मिळेल त्‍या पध्दतीने टँकरमधील पाणी घेण्याचा प्रयत्न गावकरी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोनापेक्षा मोठे संकट

सध्या कोरोनाच्या संकटाने सर्वच जण स्वत:ची काळजी घेत आहेत. लॉकडाउनच्या काळात खेडेगावातही ग्रामस्थ बाहेर पडत नव्हते. जीवनावश्यक वस्तू नसल्या तरी कोरोनाच्या भीतीने घराबाहेर जाणे टाळले. आता पाणीटंचाई निर्माण झाल्याने कोरोनाच्या संकटातही घराबाहेर पडावे लागत आहे. टॅंकर आल्यानंतर पाणी घेण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे माहित असूनही पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

  येथे क्लिक करा - अबब... ८४ प्रकल्प गाळमुक्त


एकवेळेस पाण्याचे टँकर 

काळापाणी तांडा गावात तिनशे ते साडेतिनशे लोकसंख्या आहे. ३५ घरे आहेत. उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई असते. सकाळी साडेआठ ते नऊ वाजता एकवेळेस पाण्याचे टँकर येते. टँकर आल्यावर मात्र पाणी घेण्यासाठी गर्दी होत आहे.
-रोहिदास राठोड, ग्रामस्‍थ


प्रस्तावाला चोवीस तासात मंजुरी

तालुक्‍यातील चार गावांत सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नऊ गावांत विहीरीचे अधिग्रहन केले आहे. टँकरसाठी प्रस्‍ताव आल्यास स्‍थळ पाहणी करून चोवीस तासात त्‍याला मंजुरी दिली जाणार आहे.
-जगदीश साहू, गटविकास अधिकारी


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT