जिलबीची तयारी करतांना सनीसिंह. 
मराठवाडा

मुलगी जन्मलीये..मग फुकट जिलबी खा !

गणेश पांडे

परभणी : जर आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरात कन्यारत्नाने जन्म घेतला असेल तर मग आपल्याला फुकट जिलबी खाण्यास मिळणार हे नक्की. तीही थोडी थोडकी नाही तर तब्बल दोन किलो जिलेबीने आपले तोंड गोड केले जाणार आहे. परभणी शहरातील जिलेबी विक्रेत्याचा हा उपक्रम काही नवा नाही तर गेल्या ९ ते १० वर्षापासून हा व्यापारी मुलींच्या बापाच्या सुखात सहभागी होत आहे.

कधी काळी मुलगी झाली की, कुटुंबाला तिच्या भविष्याची चिंता सतावत असे. तिच्या पालनपोषणापासून ते तिच्या लग्नापर्यंतची चिंता या मंडळीला असल्याचे दाखविले जायचे. काळ बदलला... तिच मुलगी मुलांच्या बरोबरीने शिकून पुढे गेली. मुलांच्या खांद्याला खांदा लावून नौकरी व्यवसायात सरसावली. आणि आज मुलगी जन्मली की ‘पहिली बेटी तुप रोटी’ झाली. आज घरात कन्या रत्नाने जन्म घेतला की, आमच्या घरात लक्ष्मी आली असे संबोधले जाते. या वाक्यातूनच मुलीच्या आगमनाचे स्वागत सन्मानाने केले जाते.

दहा वर्षापासूनचा उपक्रम

हरियाणातून व्यापारासाठी परभणी शहरात वास्तव्यास असलेल्या धरमवीर व सनीसिंह या हॉटेल व्यवसायीकाने गेल्या १० वर्षापासून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला आहे. दर वर्षाच्या पहिल्या दिवशी (अर्थात ता. एक जानेवारी) जन्म घेणाऱ्या मुलींच्या स्वागतासाठी या व्यापाऱ्याच्यावतीने दोन किलो जिलेबी त्या कुटूंबास भेट म्हणून दिली जाते. विशेष म्हणजे ही जिलबी सरकारी रुग्णालयात जावून वाटप केली जाते. 

यंदापासून लकी ड्रॉ द्वारे सोन्याचे नाणे
सरकारी रुग्णालयात कन्यारत्नाचा जन्म झाल्यानंतर आजपर्यंत दोन किलो जिलेबी दिली जायची. परंतू, यंदापासून सनीसिंह यांनी दिवसभरात जितक्या मुली जन्मतील त्या मुलींच्या नावाने ता. एक जानेवारी रोजी सांयकाळी भाग्यवान विजेत्याची सोडत काढली जाणार आहे. यात भाग्यवान विजेत्या मुलीला एक सोन्याचे नाणे भेट स्वरूपात दिले जाणार आहे.

हेही वाचा :   मिरचीपुड डोळ्यात टाकत मारहाण

पुर्वजांकडून मिळाली प्रेरणा


नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (ता. एक जानेवारी) कन्यारत्नाने जन्म घेतला असेल तर जन्माचे प्रमाणपत्र किंवा संबधीत डॉक्टारांचे प्रमाणपत्र दाखविल्यानंतर आम्ही जिलेबी देत असतो. दरवर्षी ६० ते ७० मुलींच्या कुटूंबियांना आम्ही २ किलो प्रमाणे जिलेबी वाटप करतो. ही प्रेरणा आम्हाला आमच्या पुर्वजांकडून मिळाली आहे. 
- सनीसिंह. जिलेबी विक्रेता, परभणी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonar Lake : अहो आर्श्चयम! लोणार सरोवरात आढळले चक्क मासे, दुर्मिळ जैवविविधता धोक्यात...

Pune: चेंजिंग रूमपासून ते मोबाईल चार्जिंगपर्यंत सुविधा... पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

तुळशीच्या लग्नानंतरच लग्नांचा शुभ मुहूर्त का सुरू होतो? जाणून घ्या कारण!

IND vs AUS, Viral Video: मैदानात शुभमन गिल बॅटिंग करत होता अन् कॅमेरा वळाला सारा तेंडुलकरकडे, पाहा कशी होती रिअॅक्शन

World Cup 2025 साठी शफाली वर्मा भारतीय संघातही नव्हती, पण नशीबनं संधी दिली अन् तिने फायनलमध्ये मैदान गाजवलं; पण शतक थोडक्यात हुकलं

SCROLL FOR NEXT