Nanded News 
मराठवाडा

मानाच्या पालखीचे माळेगावात जल्लोषात स्वागत 

एकनाथ तिडके

माळाकोळी (जि. नांदेड) : श्रीखंडेरायाची माळेगाव यात्रा परंपरेनुसार वीर नागोजी नाईकाच्या पालखीने सुरू होते. वीर नागोजी नाईक यांचे दहावे  वंशज हे लोहा तालुक्यातील रिसनगाव- बेरळी येथील आहेत. नाईकांची प्राचीन भव्य गढी आजही मोठ्या दिमाखात उभी आहे. या गढीतून खंडेरायाची पालखी बेरळी- रिसनगाव मार्ग माळेगाव येथे रवाना होत असते. या मानाच्या पालखीचे खंडेरायाचे भक्तांनी मंगळवारी (ता.२४ डिसेंबर २०१९) जल्लोषात स्वागत केले.  

देवस्वारीने माळेगाव खंडोबा यात्रेची आज सुरुवात झाली.  शासकीय विश्रामगृह येथे मानाच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत व पुजन करण्यात आले. पालखीचे विश्रामगृहात आगमन होण्यापुर्वी पारंपारीक कलावंत वारु, गोंधळी, देवकर, मनकवडे गोंधळी यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांनी श्री खंडोबाची शासकीय महापुजा केली.  शासकीय विश्रामगृह येथे पालखीच्या मानकऱ्यांचा परंपरेप्रमाणे मानाचा फेटा बांधुन सत्कारकेला. यात गणपतराव नाईक (रिसनगाव), नागेश महाजन (कुरुऴा), व्यंकटराव पांडागळे (शिराढोण), खुशालराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव नाईकवाडे (पानभोसी) यांचा समावेश होता.  

यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे,  मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती शिला निखाते, सभापती माधवराव मिसाळे, उपविभागीय अधिकारी पी.एस बोरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे, माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, माजी अध्यक्ष आनंदराव गुंडले, जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर,  चंद्रसेन पाटील, प्रणिता चिखलीकर, आशाताई शिंदे, सभापती सतिष उमरेकर, विजय धोंडगे, रंगनाथ भुजबळ,  माणिकराव लोहगावे, उपसभापती बालाजी पाटील कदम, तहसीलदार विठ्ठल परळीकर, विस्तार अधिकारी शिवाजी ढवळे, परमेश्वर मुरकुटे, जनार्धन तिडके, यात्रा सचिव श्री कोंडेकर, कालीदास मोरे, डाॅ. दिनेश निखाते, बाजीराव भालेराव, चंद्रमुनी मस्के, हरी ढवळे, विस्तार अधिकारी राजु तोटावाड, दयानंद सुर्यवंशी, बालाजी पुठ्ठेवाड, संगमेश्वर मामडे, , प्रकल्प संचालक नईम कुरेशी, सरपंच गोविंदराव राठोड, बालाजी राठोड, विजयकुमार वाघमारे, केरबा धुळगुंडे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, गटविकास अधिकारी श्री फांजेवाड, देविदास गिते आदी मान्यवर उपस्थित होते. 

हेही वाचलेच पाहिजे‘या’ किल्ल्याच्या सौंदर्यासाठी पाच कोटी खर्च
 
विविध स्टाॅलचे उद्‍घाटन 
माळेगाव यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र  येतात. या संधीचा फायदा घेत जिल्हा परिषद व राज्य शासनाकडुन विविध स्टाॅलच्या माध्यमातुन जनजागृतीपर संदेश, माहिती,  व पत्रक दिले जातात. विविध शासकीय योजना, स्वच्छता, शिक्षण, शेती तंत्रज्ञान, खते बियाणे, जल, मृदा संधारण यांची माहीती भाविकांना दिली जाते. या स्टॉलचे उद्‍घाटन अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती माधवराव मिसाळे, सभापती शिलाताई निखाते, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांच्या हस्ते झाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : मुंबईतील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT