To welcome the New Year in Hingoli, the youth is ready to follow the instructions of the government regarding Corona 
मराठवाडा

हिंगोलीत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज

राजेश दारव्हेकर

हिंगोली : नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई कोरोना संदर्भात शासनाच्या सूचना पाळत सज्ज झाली आहे. अनेकांचे बेत ठरले आहेत. या दिवसापुरता आनंद लुटण्यासाठी तरुणाई हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी आतुर झाले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनीही थर्टी फस्टचे वेगवेगळे मेनू तयार करण्याच्या नियोजनात व्यस्त झाल्याचे बघायला मिळत आहे. 

कोरोना संकटाने मागच्या काही दिवसांपूर्वी हॉटेल, ढाबा बंद असल्याने हे व्यावसायिक अडचणीत आले होते. नुकतेच हॉटेल व ढाबे कोरोना संदर्भात शासनाने दिलेले नियम पाळत सुरू झाले आहेत. त्यामुळे मागची झालेली तुट भरून काढण्यासाठी या व्यवसायिकांना नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईचा कल पाहता तयारी सुरू केली आहे. तरुणांत चायनीज डिशला सर्वाधिक पसंती राहणार असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी थर्टी फस्ट एन्जॉय करण्याची पध्दत तरुणाईंमध्ये रुजली आहे. विशेष म्हणजे या दिवशी सर्व कुटुंब एकत्र येऊन तसेच अनेकजण मित्र-मैत्रिणींसोबत एकत्र येऊन मनसोक्त गप्पा मारतात. रात्री बारा वाजता फटाके फोडून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. 

या दिवशी बाहेर मित्रांबरोबर जेवण करण्याचे बेत आत्तापासूनच ठरवले जात आहे. काही जणांनी धार्मिक स्थळांना भेट देण्याचे नियोजन केले आहे. व्हेज, नॉनव्हेज व चायनीज डिशचा बेत अनेकांनी आखला आहे. शहरातील, शहराबाहेरील हॉटेल, ढाबाचालकांनी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यास सुरुवात केलेली आहे. शिवाय खास मेनू तयार करणारे वस्तादही दाखल झाले आहेत.

अशी असेल व्हेज डिश

पनीर भुर्जी, पनीर मसाला, पनीर टिक्का, पनीर अंगारा, पनीर हंडी, काजू पनीर, मिक्स व्हेज, कोल्हापुरी व्हेज, जयपुरी व्हेज, सिंगापुरी व्हेज, मखनवाला, व्हेज हंडी, व्हेज तवा, व्हेज खिम्मा, आलू मटर, आलू गोबी, बैंगन मसाला, मेथी मसाला, भेंडी मसाला, ग्रीनपिस मसाला, शेव भाजी, चणा भाजी, दालफ्राय, दाल तडका, जिरा दाल, बटर दाल, कोल्हापुरी दाल आदी प्रकारच्या भाज्यांसह सूप, डाळी यांचा समावेश आहे. ८० आणि १०० रुपयांना एक प्लेट उपलब्ध असल्याचे वृंदावन हॉटलच्या चालकांनी सांगितले. 

बच्चेकंपनीसाठी विविध आईस्क्रिम

बच्चेकंपनीनेही या दिवशी आईस्क्रीम खाण्याचा बेत ठरवत असतात. त्यामुळे हॉटेलचालकांनी विविध प्रकारचे आईस्क्रिम ठेवण्याचेही नियोजन केले आहे. यामध्ये  व्हेनिला, बटरस्कॉच, काजू - किसमिस, केशर पिस्ता, कोन, केशर रोस्टेड, कसाटा, चोकोबार, केशर कमला, टोमॅटो चॉकलेट आदीचा समावेश आहे . आईस्क्रीम ३० रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 

अशी असेल नॉन व्हेज डिश

नॉनव्हेजमध्ये अंडा भुर्जी, अंडा आम्लेट, हाफकाय, अंडा करी, चिकन रोस्ट, विकत तंदुरी, चिकन टिक्का, चिकन मोगलाई, चिकन जिम्मा, चिकन हंडी, चिकन ६५, चिकन बिर्याणी, चिकन मंचुरियन, मटन बियाणी, मेथी मटन, फिश करी, फिश गेस्टचा समावेश असून ७० ते २०० रुपयांपर्यंत ही डिश उपलब्ध असेल असे साई गार्डनचे मालक श्री. बांगर यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेस्ट अपघातातील मृतांची ओळख पटली, २५ ते ५० वर्षीय तीन महिलांचा समावेश; ९ जणांवर उपचार सुरू

King Cobra Kolhapur अबब! कोल्हापुरात आढळला तब्बल १० फुटांचा 'किंग कोब्रा', चिकन कंपनीजवळ दिसला अन्...

माझा मुलगा आणि ती... हेमलता बाणे खंडणी प्रकरणात अर्चना पाटकरांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'माझ्या कुटुंबाचा तिच्याशी...

Priyanka Gandhi: कोण आहे प्रियांका गांधींची होणारी सून? ७ वर्षांचं नातं, आता साखरपुडा! ६५ कोटींची होणार मालकीण

Sindhudurg : धरण असूनही तहानलेले शहर! सावंतवाडीचा पाणीप्रश्न सुटणार तरी कधी?

SCROLL FOR NEXT