File photo 
मराठवाडा

शारीरिक शिक्षण कशामुळे आहे आॅक्सिजनवर : ते वाचलेच पाहिजे

प्रमोद चौधरी

नांदेड : राज्य सरकारचे उदासीन धोरण व सदोष व्यवस्थेमुळे हजारो शारीरिक शिक्षकांवर अन्याय होत आहे. आजच्या घडीला राज्यातील शाळांमधील खेळांचा भार केवळ १५ टक्‍के ‘प्रशिक्षित’ शारीरिक शिक्षकांवर आहे. हजारो पदे रिक्‍त असून, त्यांच्यावर प्रचंड कामाचा ताण आहे. त्यामुळे शालेय खेळ आणि खेळाडूंवर विपरीत परिणाम होत असून, एकूणच शारीरिक शिक्षक सध्या सलाईनवर असल्याचे निराशाजनक चित्र आहे.

शारीरिक शिक्षकाचे धोरण कागदावरच
शारीरिक शिक्षणाला आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या काळात महत्त्व देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. त्यासाठी शारीरिक शिक्षक आणि क्रीडाशिक्षक अशा दोन्हींचीही गरज लागणार आहे. पण शारीरिक शिक्षणाच्या तासिका कमी करून शारीरिक शिक्षकांच्या रिक्त जागाही भरल्या जात नाहीत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक तसेच बौद्धिक क्षमतेवर होताना दिसत आहे. काही शाळांत दोन हजार विद्यार्थी संख्येमागे केवळ एक शारीरिक शिक्षक अशी बिकट अवस्था पाहायला मिळत आहे. वास्तविक पाहता शासनाच्या धोरणाप्रमाणे २५० विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षक असला पाहिजे, पण ते धोरण काही अमलात होताना दिसत नाही.  

हेही वाचा केंद्राने या योजनेसाठी घेतला आखडता हात
 
स्वतंत्र क्रिडा शिक्षकाची गरज
शाळा-शाळांमध्ये जर शारीरिक शिक्षणासाठी स्वतंत्र क्रीडाशिक्षक ठेवला तर, मुलांना खेळांचे ज्ञान व्यापक बनेल. खाजगी शाळांमध्ये शारीरिक शिक्षकांऐवजी खेळ शिकविणारे प्रशिक्षक असतात. तेदेखील महत्त्वाचे असले तरी शारीरिक शिक्षणाला फाटा देऊन चालणार नाही. शाळेतील मुलांच्या वाढीकडे, त्यांच्या तंदुरुस्तीकडे, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक संतुलनाकडे शारीरिक शिक्षकांच्या माध्यमातून लक्ष ठेवता येईल आणि ही काळाची गरज आहे.  
 
काय म्हणतात क्रिडा शिक्षक
 
सखाराम तळेले (निवृत्त शारीरिक शिक्षक) : साधारणपणे अडीचशे विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षक असायला पाहिजे. क्रीडा धोरणात तसे नमूद आहे. कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, अद्याप पूर्ण झाली नाही. शालेय विद्यार्थ्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज शारीरिक शिक्षणाचा तास असणे गरजेचे आहे.  

 

हे देखील वाचलेच पाहिजे - पाहा...मुलगा जन्मल्यानंतर बापाने काय केले
 
बाबुराव राऊत (शारीरिक शिक्षक) : अनुदान बंद असल्यामुळे स्पर्धेसाठी खेळाडूंना पाठविताना अनेक अडचणी येताहेत. संस्थाचालक हा खर्च करीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी पाठविणे शक्‍य होत नाही. परिणामत: शालेय स्पर्धांमध्ये खेळाडूंचा सहभाग दिवसेंदिवस कमी होत आहे.    

मनोधैर्य वाढण्यास होते मदत
शारीरिक श्रमांच्या खेळांत शरीरास भरपूर व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शरीर काटक व बळकट बनते. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडू वृत्ती आदी गुणांची वाढ होते. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना व नेतृत्वगुण यांना वाव मिळतो.   
- स्वप्नाली देशपांडे (क्रिडा शिक्षिका)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT