file photo 
मराठवाडा

हे काय नविनच : सेनगाव ठाण्याचा कारभार नर्सी ठाण्याकडे, का ते वाचा...?

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  जिल्हयातील सेनगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्याने  गुरुवारी  (ता .२०)   पोलिस ठाण्याचे  निर्जंतुकीकरण करून ठाणे  बंद करण्यात आले असून सेनगाव पोलिस ठाण्याचा कारभार नर्सी नामदेव पोलिस ठाण्यातून केला  जाणार आहे . 

जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार सुरू केला आहे दररोज रुग्ण संख्या वाढत आहे कोरोना मुळे  जिल्हा परिषद , जिल्हाधिकारी कार्यालय , आरोग्य विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालयासह यासह  पोलिस दलातही प्रवेश केला आहे . सेनगाव पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सदर प्रकार पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर यांनी पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांना ही माहिती दिली आहे . त्यानंतर संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत . 

तसेच  पोलिस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करून कामकाज बंद करण्यात आले आहे . त्यानंतर आता सेनगाव पोलिस ठाण्याचा| कारभार नर्सी नामदेव पोलिस ठाण्यातून होणार  आहे . सेनगाव पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर यानी पालिस अधिक्षक योगेशकुमार यांना कळविला आहे . त्यानंतर संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत . या शिवाय पोलिस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करून कामकाज बंद करण्यात आले आहे . सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या  गावांतील गावकऱ्यांना तक्रारी व पोलिस ठाण्याच्या कामासाठी नर्सी नामदेव येथे यावे लागणार आहे .  दहा दिवस सेनगाव पोलिस ठाण्याचे कामकाज राहण्याचे  पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

Dermatitis Spread: 'साेलापूर शहरात टिनिया, कॅन्डिडासह त्वचेच्या विकारांत होतेय वाढ'; शहरात अतिवृष्टी, घाण पाणी अन् ओलाव्याचा परिणाम

Viral Restaurant Video : मुलांनी रेस्टॉरंटमध्ये केली 'ही' चूक, पालकांना भरावा लागला २.७१ कोटींचा दंड, नेमकं काय घडलं ?

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Nanded News: बंजारा समाजाची आरक्षणासाठी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा, हजारो महिला-पुरुष सहभागी

SCROLL FOR NEXT