file photo
file photo 
मराठवाडा

गहु, हरभऱ्यावर तांबेरा : ‘या’ करा उपाययोजना

कैलास चव्हाण


परभणी : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पेरणी झालेल्या गहु आणि हरभरा पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.त्यामुळे ही दोन्ही पिके अचानक पिवळी पडुन करपली जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
मराठवाड्यात उशीरापर्यंत थांबलेल्या पावसामुळे यंदा रब्बी पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यात बागायती गहु आणि हरभरा क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, जालना आणि लातुर जिल्ह्यात हरबरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तसेच जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यासह येलदरी धरणाच्या लाभ क्षेत्रातील हिंगोली जिल्ह्यात गव्हाची पेरणी झालेली आहे. उशीरा पाणीपातळी सोडल्यामुळे बहुतांष शेतकऱ्यांनी डिसेंबर महिण्यात गव्हाची पेरणी केलेली आहे. सध्या गहु ओंबी अवस्थेत आहे. तर हरभरा पिकदेखील घाटेभरण्याच्या अवस्थेत आहे. येत्या महिना-दोन महिण्यात दोन्ही पिके काढणीला येणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच गहु आणि हरबरा पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तांबेरा हा मुख्यत गहु पिकावर पडणारा रोग आहे. मात्र, सध्या हरबरा पिकावर देखील हा रोग आढळुन येत असल्याने नुकसानीची तिव्रता वाढली आहे.

 काय आहेत कारणे
तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्यामागे  वातावरण बदल हे मुख्य कारण सांगीतले जात आहे. यंदा गव्हाला पोषक असे वातावरण निर्माण झालेच नाही. मराठवाड्यात बहुतांष भागात गव्हाची उशीरा झालेली पेरणी हे देखील एक कारण आहे.तसेच जानेवारी महिण्यापासून सातत्याने ढगाळ वातावरण राहील्याने गगव्हाची पुरेसी वाढ झाली नाही,पुरेसा स्वच्छ सुर्यप्रकाश मिळाला नाही,त्याचा परिणाम म्हणून तांबेराचा प्रादुर्भाव अधिक तिव्रतेने वाढला आहे.

हेही वाचा -  ‘सीईओं’नी पकडली कॉपी !

असे करा व्यवस्थापन
तांबेरा  या रोगाच्‍या व्‍यवस्‍थापनाकरिता प्रोपिकॉनाझोल २५ टक्के  ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.किंवा मॅन्कोझॅब,किंवा झायनेबल ७५ टक्के एकरी ५०० लिटर पाणी वापरुन फवारणी करावे. सदरिल प्रमाण साधा पंपासाठी असुन पॉवर स्‍पेअर करिता औषधाचे प्रमाण तीन पट करावे असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी दिला आहे. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राशी संपर्क साधावा. त्यासाठी दुरध्‍वनी क्रमांक (०२४५२-२२९०००) हा आहे. 

वर्णा शिवारातील घेतले नमुने
वर्णा ता.जिंतुर शिवारात जवळपास सर्वच पेरणी केलेला गगहु मागील आठ दिवसापासून कररपत आहे.अनेक शेतकऱ्यांचा गहु अचानक वाळुन गेल्याने शेतकऱ्यांत चिंता पसरली आहे.गुरुवारी (ता.२७) कृषि विद्यापीठाच्या  शास्त्रज्ञांनी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे मुख्य व्यवस्थापक  डॉ.यु.एन.आळसे यांच्या नेतृवात वर्णा येथे भेट देऊन पाहणी केली आहे.सर्वच शिवारातील गहु वाळल्याने नेमका काय प्रकार आहे हे तपासण्यासाठी गव्हाचे नमुने घेतले असून किटकशास्त्र विभागातील प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत.


विद्यापीठाशी संपर्क साधा
मराठवाड्यात सर्वत्र गव्हावर तांबेरा रोग अढळुन येत आहे.त्यासोबतच हरभरा पिकावर देखील प्रादुर्भाव झाला आहे.शेतकऱ्यांनी तात्काळ विद्यापीठाशी संपर्क साधुन उपाययोजना कराव्यात.
- डॉ. यु. एन. आळसे, व्यवस्थापक  कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT