Corona
Corona 
मराठवाडा

धक्कादायक: लातूरातील ‘त्या’ चिमुकलीचे अख्खे कुटुंबच कोरोनामय

सुशांत सांगवे

लातूर: शहरातील एमआयडीसी भागातील हडको कॉलनीत ६ वर्षाची चिमुकली कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर तिच्या घरातील ४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. या चौघांचेही अहवाल रविवारी (ता. २४) पॉझिटिव्ह आले.

याबरोबरच उदगीरमधील ५ तर अहमदपूरमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लातूरमधील कोरोनाबधितांची एकूण संख्या ९४ झाली आहे. यापैकी ५५ जणांवर उपचार सुरू असून ३६ जणांना घरी सोडण्यात आले आहे तर तिघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण १९७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी संस्थेत आलेल्या ३४ व्यक्तीपैकी ३० व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून ४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे चारही रुग्ण शनिवारी (ता. २३) पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मुलीच्या कुटुंबातील आहेत. हे सर्व एमआयडीसी हडको येथील असून त्यांना कुठल्याही प्रकारचलची लक्षणे नाहीत. त्यांची सद्यस्थितीत प्रकृती ठीक आहे.

उपजिल्हा रुग्णालय (उदगीर) येथून एकुण ५१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ४४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २ व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नाहीत. अहमदपूर येथुन ११ व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते. त्यापैकी ६ व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ३ व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नाहीत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी रविवारी दिली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
        
निलंगा येथून ५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील ५ व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते. त्यापैकी पाचही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील तपासणीसाठी आलेल्यापैकी ९३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून ११ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व ६ व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

असा आहे कोरोना मीटर
एकूण बाधित : ९४
उपचार सुरू असलेले : ५५
बरे झालेले : ३६
मृत्यू : ०३

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT