file photo 
मराठवाडा

कस काम करणार...! महावितरणची १३३ कोटीची थकबाकी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महावितरण नांदेड परिमंडळातील एक लाख ५८ हजार ९२४ वीजग्राहकांकडे १३३ कोटी ४९ लाख रुपयाची थकबाकी आहे. महावितरणने थकबाकीदारावर कारवाई करत पाच हजार ६५७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत केला. तर नऊ कोटी ४९ लाखाची वसुली केली. ही मोहीम एक मार्चपासून मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणरा आहे. परिमंडळात नांदेड, परभणी व हिंगोली हे तीन जिल्हे येतात. 

नांदेड जिल्ह्यातील ५४ हजार ९५६ घरगुती वीजग्राहकांकडे १० कोटी ७३ लक्ष रूपये, तीन हजार ३३२ व्यावसायिक वीजग्राहकांकडे एक कोटी ५५ लक्ष, ४६९ औद्योगिक वीजग्राहकांकडे ५५ लक्ष रूपये तर स्थानिक स्वराज्य संस्थाकडील १०३ पाणीपुरवठा योजनांची एक कोटी ८५ लक्ष रूपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम वर्गवारीत मोडणाऱ्या ४६८ वीजग्राहकांकडे ७२ लक्ष व इतर वर्गवारीतील ३३ वीजग्राहकांकडे १८ लक्ष रूपयांची थकबाकी आहे. अशा प्रकारे कृषीपंप वीजग्राहक वगळता ५९ हजार ३६१ वीजग्राहकांकडे चालू देयक थकबाकी १५ कोटी ५७ लक्ष रूपये आहे. एक फेब्रुवारीपासून चालू केलेल्या वसुली मोहीमेत एक हजार ५७१ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करत चार कोटी ४० लक्ष रूपयांची वसुली करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सध्यस्थिती

हिंगोली जिल्ह्यातील २९ हजार ७५० घरगुती वीजग्राहकांकडे आठ कोटी पाच लक्ष रूपये, एक हजार ११७ व्यावसायिक वीजग्राहकांकडे ६८ लक्ष, ३०५ औद्योगिक वीजग्राहकांकडे ३६ लक्ष रूपये तर स्थानिक स्वराज्य संस्थाकडील २७ पाणीपुरवठा योजनांची ३५ लक्ष रूपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम वर्गवारीत मोडणाऱ्या २३६ वीजग्राहकांकडे ४१ लक्ष व इतर वर्गवारीतील सहा वीजग्राहकांकडे चार लक्ष रूपयांची थकबाकी आहे. अशा प्रकारे कृषीपंप वीजग्राहक वगळता ३१ हजार ४४१ वीजग्राहकांकडे चालू देयक थकबाकी नऊ कोटी ८८ लक्ष रूपये आहे. त्याचबरोबर एक फेब्रुवारीपासून चालू केलेल्या वसुली मोहीमेत ५७० वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करत एक कोटी ८९ लक्ष रूपयांची वसुली करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील सध्य स्थिती 

परभणी जिल्ह्यातील ६३ हजार ७०० घरगुती वीजग्राहकांकडे १०१ कोटी पाच लक्ष रूपये, तीन हजार २२६ व्यावसायिक वीजग्राहकांकडे दोन कोटी ८५ लक्ष, ६३९ औद्योगिक वीजग्राहकांकडे एक कोटी २१ लक्ष रूपये तर स्थानिक स्वराज्य संस्थाकडील ६२ पाणीपुरवठा योजनांची एक कोटी ६२ लक्ष रूपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम वर्गवारीत मोडणाऱ्या ४२५ वीजग्राहकांकडे एक कोटी २३ लक्ष व इतर वर्गवारीतील ७० वीजग्राहकांकडे आठ लक्ष रूपयांची थकबाकी आहे. अशा प्रकारे कृषीपंप वीजग्राहक वगळता ६८ हजार १२२ वीजग्राहकांकडे चालू देयक थकबाकी १०८ कोटी चार लक्ष रूपये आहे. त्याचबरोबर एक फेब्रुवारीपासून चालू केलेल्या वसुली मोहीमेत तीन हजार ५१६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करत तीन कोटी २० लक्ष रूपयांची वसुली करण्यात आली आहे.

थकबाकीदारांनी वीजबिलाचा भरणा करावा 

महावितरणची आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी वीजबिलांची पूर्ण वसुली होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निष्ठेने व एकजुटीने काम करण्याची गरज आहे. वारंवार सुचना देऊनही वीजग्राहक बील भरत नसतील तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. विकलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली झालीच पाहिजे. यात कुचराई झाल्यास संबंधीतांना कारवाईला सामोरे जावे लागेल. वीजबिलांची वसुली करताना किंवा वीजपुरवठा खंडीत करताना संवेदनशील भागात आवश्यक काळजी घ्या. प्रसंगी पोलीसांचे सहकार्य घेवून वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई करा. तसेच कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलाचा त्वरीत भरणा करून महावितरणला सहकार्य करावे. 
दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT