photo 
मराठवाडा

यामुळे हॉटेल व्यावसायीक फेकतात पहिला चहा 

जगन्नाथ पुरी

सेनगाव(जि. हिंगोली): चहा मानवी जिवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येकजण दिवसभरात तीन ते चार वेळेस तरी चहा पितो. त्यामुळे मोठ्या खेडेगावांसह शहरात टी हाऊस सुरू आहेत. यातून दिवसभरात हजारो रुपयांची उलाढाल होते. अनेकांना रोजगार मिळाला आहे. विविध चहाचे प्रकारही पडले आहेत. मात्र, चहा विक्रेते सकाळीच बनविण्यात आलेला पहिला एक कप चहा दुकानासमोरील अंगणात वाहतात. ही अनेक वर्षांची परंपरा आहे.

चहा हे एक पेय नाहीतर ती संस्कृती बनली आहे. प्रत्येक घरातील सदस्यांची सुरुवात सकाळी चहाने होते. चहाला दोनशे ते तीनशे वर्षांचा इतिहास असला तरी चहा हे प्राचिन म्हटले जाते. हे आवडतं पेय आपल्यापर्यंत पोचायला १७ व १८ वे शतक उजाडावे लागले. चहा लोकप्रिय करण्यासाठी ब्रिटिशांनी खूप प्रयत्न केले. आज घडीला छोट्या खेडेगावात चहाचे हॉटेल सुरू आहेत. मोठे खेडे व शहरात ठिकठिकाणी चहाचे हॉटेल आहेत. चहाच्या प्रवाहात अनेक वर्षांपासून बरेच बदल होत गेले आणि चहा उत्पादकांकडून दर्जावर लक्ष दिले गेले. ब्लॅक टी, कॉफी, गोल्डन चहा, मलइ चहा आदी प्रकार आहेत. 

एक हजार लिटर दुधाची विक्री

सेनगाव शहरात जवळपास तीस हॉटेल असून चहाचा व्यवसाय चांगल्या प्रमाणात होतो. शहरात दररोज एक हजार लिटर दुधाची विक्री होते. यामध्ये विविध कंपनीच्या पाकिटाचे ३५० लिटर दूध तर शेतकऱ्यांकडून गाय, म्हैस, शेळीचे मिळून ६५० लिटर खुल्या दुधाचा समावेश आहे. साधारणत: एक ते सव्वा कोटी रुपये वार्षिक उलाढाल होते. येथे पूर्वी परराज्यातून येणाऱ्या गुजराती, राजस्थानी व्यवसायिकांच्या हॉटेल्स असत. मात्र अलीकडच्या काळात स्थानिक नागरिकांनीही या व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. 

लाखो लोकांना रोजगार मिळाला

चहा भारतीयांच्या जिवनातील अविभाज्य घटक असल्यामुळे त्याचे विशेष महत्व आहे. प्रत्येक नागरिक दिवसभरातून किमान दोन कप चहा सेवन करतोच. चहा हे तरतरी आणण्यासाठीचे पेय म्हणून ओळखले जाते. देशात दोन हजार चहा उत्पादक असल्याचे विक्रेते सांगतात. काही चहा उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वतःचं स्थान निर्माण केले आहे. या उद्योगातून लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान, येथील विविध चहा हॉटेलमध्ये सकाळी स्वच्छता केल्यानंतर बनविण्यात येणारा पहिला एक कप चहा दुकानाच्या अंगणात टाकण्याची परंपरा आहे. 

देवाच्या नावाने अंगणात वाहिला जातो चहा

सकाळी बव्हणीच्या वेळेस कितीही अर्जंट ग्राहक चहासाठी आले तरीही एक ग्लास पाणी व एक कप पहिला चहा अंगणात टाकला जातो. त्यानंतरच ग्राहकांना चहा विक्री होतो. या पाठीमागे नेमके शास्त्रीय कारण कोणते आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासंदर्भात विविध चहा विक्रेत्यांशी संवाद साधण्यात आला. बनविलेल्या चहातील पहिला एक कप चहा देवाच्या नावाने अंगणात वाहिला जातो, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे व्यवसायाला भरभराटी येते. यातून आर्थिक सुबत्ता येते, असेही काही विक्रेत्यांनी सांगितले.


 नैवेद्य ईश्वराला अर्पण व्हवा हा उद्देश

मागील सोळा वर्षांपासून शहरात हॉटेल व्यवसाय चालवित आहे. चांगल्या प्रतीचा चहा ग्राहकांना देण्यावर भर राहतो. सकाळीच दुकान सुरू केल्यावर पहिला एक कप चहा अंगणात अर्पण केल्या जातो. या पाठीमागे पहिला नैवेद्य ईश्वराला अर्पण व्हवा हा उद्देश आहे. बहुतांश व्यवसायीकाकडून नित्यनियमाने याचे पालन होते.
-देवानंद वाढेकर, हाॅटेल व्यवसायीक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : जूनभर कोरडे राहिले शहर, जुलैच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने भरून काढली उणीव

SCROLL FOR NEXT