FILE PHOTO 
मराठवाडा

का वाढतोय ज्येष्ठांमध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण?

शिवचरण वावळे

नांदेड :  भारत देश तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातो. याच देशात ज्येष्ठांची संख्यादेखिल सर्वाधिक आहे. परंतु, ज्येष्ठ म्हणजे घरातील अडगळ हा गैरसमज तरुण पिढीत वाढत असल्याने अनेक ज्येष्ठांना घरातच सन्मानाची वागणूक मिळत नाही. ज्येष्ठांचा अनादर होत असल्याने वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. नेमक्या याच कारणामुळे वार्धक्याकडे झुकलेल्या ज्येष्ठांमध्ये साठीनंतर स्मृतिभ्रंश (Dementia) आणि अल्झाइमर स्मृतिभ्रंश आजाराचे प्रमाण वाढत आहे. 
विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय उपाधिक्षक तथा मनोविकारतज्ज्ञ डॉ. प्रदीप बोडके यांनी माहिती देताना २००१ च्या अहवालाकडे लक्ष वेधताना भारतात ७५ मिलियन पेक्षा जास्त लोक ६० वर्षाचे होते. त्यात अजून भर पडली. याच ज्येष्ठांना स्मृतिभ्रंश (Dementia) हा मेंदूचा दुर्धर आजार सर्वाधिक दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

सौम्य आजाराकडे गांभिर्याने बघण्याची गरज
ज्यामधे मेंदूच्या विविध कार्यक्षमतेवर परिणाम होतो. प्रामुख्याने स्मरणशक्ती, भाषा शिकण्याची अक्षमता, समज, वेळेचे भान न राहणे यात प्रामुख्याने मेंदूच्या विविध भागांची झिज होते. या आजारांची सुरुवात छोट्या-छोट्या गोष्टींचा विसर पडण्यापासून होते. विशेषतः तत्काळ केलेल्या कृती विसरणे. यापासून होऊ शकते बऱ्याचदा दीर्घकालीन स्मृतीवर परिणाम दिसून येत नाही. वार्धक्यानुसार आलेला विसराळूपणा असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, सुरुवातीला सौम्य वाटणारा हा आजार कालांतराने तीव्र स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे ह्या आजाराकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

आजाराचे प्रमाण वाढत आहे
पूर्ण लोकसंख्येच्या साडेसात लोक वयस्क होते. आता ते प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात ८.७ टक्के आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्मृतिभ्रंश (Dementia) या आजाराचे प्रमाण वाढत आहे. ६० वर्षाच्या वर पाच टक्के लोकांना हा आजार होण्याची शक्यता असते. तर ८० वर्षाच्या वर वय असलेल्या २० टक्के लोकांना हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कशामुळे होतो हा आजार 
ब्रेन टुमर मेंदूमधील रक्ताच्या गाठी, थायराईडचा आजार, व्हीटॅमिन बी-१२ ची कमतरता यामुळे सुद्धा स्मृतिभ्रंश (dementia) आजार होऊ शकतो. स्मृतिभ्रंश (Dementia) च्या अनेक प्रकारामागे अल्झाइमर स्मृतिभ्रंश खूपच कॉमन आजार असतो.

अशी असतात लक्षणे
दैनंदिन जीवनात गोष्टींचा विसर पडणे, नाव, वस्तू, विसरणे, कालांतराने स्वतः बद्दलची ओळख विसरणे, जवळच्या माणसाला न ओळखणे, झोप न येणे, वागणुकीत बदल, चीड चीड करणे, एकट्यात बडबड करणे, भास होणे

उपचार
औषध गोळ्यांनी स्मृतिभ्रंशची गती कमी करता येते. परंतु, हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. स्मृतिभ्रंश बद्दल जनजागृती करणे, या आजाराचे लवकर निदान करून उपचार सुरू करणे आणि पुनर्वसन करणे या तीन प्रमुख बाबीने स्मृतिभ्रंश रुग्णांचे उपचार चांगले होऊ शकतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT