file photo
file photo 
मराठवाडा

पत्नीचा खून, निर्दयी पतीला जन्मठेप

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लाकडाच्या दांड्याने डोक्यात जबर मारून पत्नीचा निघृन खून करणाऱ्या निर्दयी पतीला येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी शनिवारी (ता. २९) जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

शहराच्या जुना कौठा परिसरातील बसवेश्‍वरनगर मध्ये राहणारा आरोपी पती हिरासिंह उर्फ उमेशसिंह ठाकुर (वय २७) हा पत्नी कोमलसोबत राहत असे. चार वर्षापूर्वी त्यांचे रितीरिवाजानुसार लग्न झाले होते. लग्नानंतर तिला काही दिवस सासरी चांगले नांदवले. त्यानंतर ॲटो खरेदी करण्यासाठी माहेराहून ५० हजाराची मागणी करून तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. त्याला त्याची आई व इतर नातेवाईक मदत करत असत. यामुळे यांच्यात नेहमी वाद होत असत. 

नांदेडच्या कौठा येथील बसवेश्वरनगरची घटना

ता. पाच फेब्रुवारी २०१६ रोजी पुन्हा सकाळी साडेसहाच्या सुमारास कौठा येथील राहत्या घरी वाद सुरू झाला. यातच आरोपी पतीने लाकडी दांड्याने कोमलच्या डोक्यात जबर मारून तिला ठार केले. ही घटना घडण्यापूर्वी यांच्यातील होणारा वाद समाजाच्या बैठकीत आला. पती व त्याच्या अन्य नातेवाईकांची समजुत काढुन त्यांना नांदेड येथे बसवेश्वरनगर कौठा येथे किरायाने घर घेऊन दिले व ते सर्व राहू लागले. तरी पण तिला त्रास चालुच होता. या त्रासातून तिचा खून करण्यात आला. 
 
खून व हुंडाबळीचा गुन्हा

या घटनेची तक्रार नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात मयताचे वडील कवलसिंह लोकमनसिंह परमार यांच्या फिर्यादीवरुन पती हिरासिंह ठाकूर याच्यासह सासु व दीर यांच्यावर खून व हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास फौजदार पी. के. मराडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

येथे क्लिक करा ‘का’ आहेत अल्पवयीन मुली असुरक्षिततेच्या सावटात
 
प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांचा निकाल

न्यायाधिश दीपक धोळकिया यांनी दहा साक्षीदार तपासले. आरोपी पतीस जन्मठेप आणि दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी सासु निर्मळाबाई अंकुश ठाकुर (वय ६५), दीर गणेशसिंह अंकुशसिंह ठाकुर (वय ३२) रा. हा. मु. बसवेश्वरनगर, कौठा, नांदेड यांना मुक्त करण्यात आले. सरकार पक्ष्यातर्फे जिल्हा सरकारी वकिल आशिष गोदमगावकर यांनी जबर युक्तीवाद केला. तर आरोपीचा बचाव ॲड. आर. जी.परळकर यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

Latest Marathi News Live Update : 'भाजप उमेदवार म्हणतायत संविधान बदलू, मात्र मोदी..'; काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

SCROLL FOR NEXT