Beed Ashti News 
मराठवाडा

कापूस वेचणी करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा अचानक हल्ला, मांडीचा चावा घेत लाचका तोडून केले गंभीर जखमी

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) : कापूस वेचणीचे काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. तालुक्यातील हाजीपूर येथे गुरुवारी (ता. 25) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रभागा महादेव राख (वय 60 वर्षे) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की हाजीपूर येथील चंद्रभागा राख या घरापासून जवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात गुरुवारी सकाळपासून कापूस वेचणीचे काम करीत होत्या.

या वेळी पाठीमागून आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला केले. मांडीचा चावा घेत अक्षरशः लचका तोडल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या. उपचारार्थ त्यांना सुरवातीला आष्टीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमा गंभीर असल्याने शहरातीलच एका खासगी दवाखान्यात त्यांना हलविण्यात आले आहे.


रानडुकरांचा वाढता उपद्रव
तालुक्यातील ब्रह्मगाव, कासेवाडी, हाजीपूर , करंजी आदी भागात सध्या रानडुकरांचा उपद्रव वाढला असून हल्ल्यांच्या घटनाही वाढत आहेत. वनविभागाने रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT