file photo 
मराठवाडा

दोन चिमुकल्यांसह महिलेची  विहिरीत उडी !

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर (जि.परभणी) : अंगलगाव (ता. जिंतूर, जि. परभणी) शिवारात रविवारी (ता. पाच) सकाळी आठच्या सुमारास एका तीसवर्षीय महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेतातील मजुरांच्या प्रयत्नामुळे महिलेचे प्राण वाचले. मात्र, दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेमागचे कारण अस्पष्ट असून सदरप्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल नव्हता.


आंबरवाडी (ता. जिंतूर) येथील रहिवासी अनिता कुंडलिक पवार (वय ३०) आपल्या दोन मुलांसह सकाळी अंगलगाव येथील सुभाष भीमराव कंडुरे यांच्या विहिरीजवळ गेली. त्या वेळी तिने प्रथम दोन्ही मुले विहिरीत टाकले नंतर स्वतःही विहिरीत उडी घेतली. त्या वेळी तिला उडी मारताना काही शेतमजुरांनी पाहिले असता त्यांनी तत्काळ  विहिरीकडे धाव घेऊन सदरील महिलेस बाहेर काढले. पण, श्रावण (वय पाच) आणि अश्विनी (वय आठ) या बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

महिलेची प्रकृती चिंताजनक
घटनेची माहिती समजताच बामणी पोलिस ठाण्याचे फौजदार सदानंद मेंढके, सहायक फौजदार पठाण, जमादार शिवाजी भोसले व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत मुलाचे शवविच्छेदन येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. अनिता पवारची प्रकृती चिंताजनक असल्याने तीस पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेबाबत सायंकाळपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला नाही.


हेही वाचा ....
क्षुल्लक कारणावरून मारहाण
सोनपेठ (जि.परभणी) :
लाकडे टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची घटना खडका 
(ता. सोनपेठ, जि. परभणी) येथे घडली. खडका येथील गंगाबाई परमेश्वर यादव यांचे गावातीलच अजय यादव व सौरभ यादव यांच्यासोबत ता. तीन एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरासमोर लाकडे टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादातून अजय यादव व सौरभ यादव यांनी गंगाबाई यादव यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद दिल्यावरून सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास जमादार गवारे हे करत आहेत.

हेही वाचा - जलसंधारणामुळे दुष्काळी गावातील बहरल्या फळबागा
हेही वाचा ....
दारू अड्ड्यावर छापा
पूर्णा (जि.परभणी) :
कात्नेश्वर (ता. पूर्णा) शिवारात पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर रविवारी (ता. पाच) दुपारी एकच्या सुमारास छापा टाकून दारू बनविण्याचे एक हजार लिटर रसायन, २५ लिटर गावठी दारू, एक दुचाकी, दोन ड्रम, गूळ, नवसागर आदी साहित्य जप्त केले.
कात्नेश्वर-आहेरवाडी रस्त्यावर कात्नेश्वर शिवारातील शेतात अवैधरीत्या विनापरवाना गूळ, नवसागर, रासायनिक पदार्थाचा वापर करून गावठी दारू बनविण्याचा उद्योग सुरू होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ व रमाकांत नागरगोजे, जमादार जरार खान सिद्धिकी, किशोर कवठेकर, हणमंत टाक, शिवरत्न शिंदे, सय्यद कलंदर, अक्षय वाघ, कात्नेश्वरचे पोलिस पाटील ज्ञानोबा काटकर यांच्या पथकाने कात्नेश्वर शिवारातील आहेरवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात रविवारी (ता. पाच) दुपारी छापा टाकला. 

एक हजार लिटर दारू नष्ट
पोलिस दारू अड्ड्याकडे येत असल्याचे पाहाताच तेथून शेतमालक तथा आरोपी कैलास जाधव याने पळ काढला. घटनास्थळांवर पोलिसांनी अर्धवट तयार असलेली एक हजार लिटर दारू नष्ट केली. २५ लिटर तयार गावठी दारू, एक दुचाकी , दोन टाक्या, गूळ, नवसागर, बाटल्या आदी दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दारूबंदी कायद्यानुसार आरोपी कैलास जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे करीत आहेत. फरार आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Sheikh: येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू; सहर शेख यांना पाठिंबा देत इम्तियाज जलीलांचे वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?

Bigg Boss Marathi 6: शिवी घालण्यावरून प्राजक्ता- अनुश्री रितेशसमोरच भिडल्या ; "म्हणजे शिवी द्यायची का?"

Mumbai Goa Highway Traffic : सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडीचे विघ्न! मुंबई गोवा महामार्गासह इतरही ठिकाणी वाहतूक कोंडीने पर्यटक प्रवासी बेजार

IndiGo Flights Cancelled : सरकारचा ‘इंडिगो’ला आणखी एक मोठा दणका! तब्बल ७०० हून अधिक उड्डाणे केली आहेत कमी

IND vs NZ: सूर्यकुमार भारताला मॅच जिंकवून आला अन् थेट 'त्या' खास व्यक्तीच्या पायाच पडला; Photo Viral

SCROLL FOR NEXT