कळमनुरी (जि. हिंगोली) : येथील पोलिस ठाण्यात जागतिक महिलादिनानिमित्त रविवारी (ता. आठ) अकरावीत शिकत असलेल्या गायत्री वाकडे या विद्यार्थिनीला आमंत्रित करीत प्रभारी पोलिस निरीक्षकपदाचा पदभार देण्यात आला. पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
जागतिक महिलादिनानिमित्त पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे, कर्मचारी कमल राठोड, अंबूताई चव्हाण, सीमा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर महात्मा जोतिबा फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींना पोलिस ठाण्यात आमंत्रित करून जागतिक महिलादिनानिमित्त त्यांना पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली.
हेही पहा - नैसर्गिक रंगांचीच होणार उधळण
विद्यार्थिनींना पोलिस ठाण्यांतर्गत कामकाजाची माहिती
या वेळी अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या गायत्री सुनील वाकडे या विद्यार्थिनीला महिलादिनानिमित्त पोलिस निरीक्षकपदाचा पदभार देत पोलिस प्रशासनाचे कर्तव्य व जबाबदारी वायरलेस कक्ष, आरोपींना ठेवण्यात येणारी पोलिस कोठडी, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वापरण्यात येणारी शस्त्र, यासंदर्भात उपनिरीक्षक प्रतिभा शेटे यांनी माहिती दिली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनींना पोलिस ठाण्यांतर्गत नागरिकांच्या आलेल्या तक्रारी व इतर कामकाजासंदर्भात पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांनी माहिती दिली.
पोलिस कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती
या वेळी पोलिस कर्मचारी नागोराव हडगीर, रवी बांगर, पवन चाटसे, निरंजन नलवार, शिवाजी पवार, सूर्यकांत भारशंकर, प्रा. गुलाब भोयर, श्री. शाहू, श्री. पतंगे, श्री. पिंपरे यांची यांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनीही पोलिस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलिस निरीक्षक श्री. भोईटे यांचे आभार मानले.
आखाडा बाळापुरात महिलांचा सत्कार
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : येथील पोलिस ठाण्यामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा जागतिक महिलादिनानिमित्त रविवारी (ता. आठ) शहरातील महिलांनी सत्कार केला. यानिमित्त केक कापून दिवसभर पोलिस ठाण्याच्या कारभार महिला पोलिसांच्या हाती सोपविण्यात आला. या वेळी डॉ. संगीता कत्रुवार, डॉ. अभिलाशा मिरासे, ताराबाई पवार, भारतबाई पानपट्टे, मंगला ढोणे, श्रीमती नरवाडे, श्रीमती सोलापुरे, श्रीमती लांडगे, जिजा गारोळे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
येथे क्लिक करा - ५८९ थकबाकीदार वीज ग्राहकांना दणका
एकमेकांना शुभेच्छाही दिल्या
या वेळी महिलांनी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. त्यानंतर केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला. उपस्थित महिलांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. पोलिस निरीक्षक विकास थोरात, सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, पोलिस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, हनुमंत पाटील नखाते यांनी महिला पोलिस कर्मचारी व महिलांचा सत्कार केला.
टाकलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली
विशेष म्हणजे महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने पोलिस निरीक्षक विकास थोरात यांनी दिवसभर ठाण्याचा कारभार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या हाती सोपविला. महिला कर्मचाऱ्यांनीच अधिकारी, ठाणे अंमलदार व इतर अधिकारी म्हणून काम पाहिले. महिलांनीही त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत महिला पोलिस कर्मचारीही कुठेही मागे नाहीत, हे दाखवून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.