मराठवाडा

दुचाकीवरून पाणी आणताना अपघात; महिला ठार

सकाळवृत्तसेवा

बीड : दुचाकीवरून ड्रमने पाणी आणताना दुचाकी घसरुन पडल्याने एक महिला जागीच ठार झाली. या महिलेच्या अंगावर पाण्याने भरलेला ड्रम पडल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना बीड तालुक्यातील गुंजाळा येथे घडली. मिनाक्षी अनुरथ घुगे (वय २८, रा. गुंजाळा, ता. बीड) असे या महिलेचे नाव आहे. बीडमधील पाणी टंचाईचा हा चौथा बळी आहे.

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिमी असून, यंदाच्या हंगामात केवळ ३३४ मिमी एवढाच पाऊस झाला. मोठे पाऊस न झाल्याने जलस्त्रोतांमध्ये पाणी आले नाही. मागच्या वर्षीचे साठलेले पाणीही संपत आले आहे. जिल्ह्यातील बहुतेक प्रकल्प कोरडेठाक आहेत. जलस्त्रोतांतील पाणीसाठा केवळ ०.६५ टक्के एवढाच शिल्लक आहे. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. नऊशेवर टँकर असले तरी टँकरच्या खेपा वेळेवर होत नाहीत तर आलेल्या टँकरमधूनही दूषित पाणी येत आहे.

दरम्यान, तालुक्यातील गुंजाळा येथे पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पाण्यासठी भटकंती करावी लागत आहे. मिनाक्षी व अनुरथ हे दोघे शनिवारी दुचाकीवर ड्रम ठेवून पाणी आणत होते. शेतातील बोअरमधून पाणी भरून ते दुचाकीवरून गावी परतले. याचवेळी रस्त्यात त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये ड्रम त्यांच्या अंगावर पडला. यामुळे मिनाक्षी गंभीर जखमी झाल्या. तसेच पती अनुरथही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तात्काळ जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. मात्र, रस्त्यातच मिनाक्षी यांचा मृत्यू झाला. तर पती अनुरथवर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृतीही गंभीर आहे. 

टंचाईचा चौथा बळी

पाणी टंचाई बळीची ही चौथी घटना आहे. यापूर्वी गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे आडातून पाणी भरताना पडून वृद्धेचा, वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे पाण्याचे ड्रम असलेली बैलगाडी अंगावर पडल्याने दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT