file photo 
मराठवाडा

साहेब, आम्हाला घरी पोहचवा ! 

दिलीप मोरे

देवगावफाटा (जि.परभणी) : लाॅकडाउनमुळे सर्व बंद झाले असल्याने हाताला काम नाही. जवळील पैसेही संपले, शहरात कोणी ओळखीचे नसल्याने पोट कसे भरणार?, असा प्रश्न आमच्यासमोर होता. अशातच विचार केला अन् मग ठरवले मजल-दरमजल करीत पायी निघालोय पायी चालत आसतांना रस्त्यावरील गावाचे ग्रामस्थ जे खायला देतील त्यावरच समाधान मानून पुढील गावाच्या दिशेने पाय टाकत आहोत. आता मात्र, आम्ही थकलो असून, ‘साहेब, आम्हाला आमच्या घरी पोहचवा’ अशी केविलवाणी आर्त हाक हे नाशिक येथून पायपीट करत निघालेले कामगार देत आहेत.
दरम्यान, तीन कामगारांचे कुटुंब शनिवारी (ता. नऊ) दुपारी देवगावफाटा (ता. सेलू, जि.परभणी) परिसरात पोहचले. भर उन्हात या कुंटूंबीयानी झाडाच्या सावलीखाली विश्रांती घेतली. मात्र, घराची ओढ लागली असल्यामुळे त्यांनंतर पुन्हा ते पायीच पुढिल प्रवासासाठी मार्गस्थ झाले.   

कोरोना विषाणूची साखळी खंडीत व्हावी या उद्देशातून केंद्र व राज्य सरकारने येत्या १७ मेपर्यंत लाॅकडाउनची मुदत वाढवली. परंतु, हातावर पोट असणाऱ्यासह मजूर वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई या शहरात राहणाऱ्या मजुरांना घराची ओढ लागल्याने त्यांनी भर उन्हात शेकडो किलोमीटरवर चक्क पायी चालण्याचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे देवगावफाटा परिसरातून जाणाऱ्या औरंगाबाद-नांदेड या महामार्गावरून दररोज कित्येक छोटी-मोठी लहान मुलाबाळांसह महिला व तसेच मजुर पायी आपल्या गावाकडे जातांना दिसून येत आहेत. 

ऑनलाईन प्रक्रिया किचकट
असेच एक नांदेड जिल्ह्यातील कदम हे कुंटूंब काफील्यासह आपल्या घराकडे निघाले होते. शनिवारी ते देवगावफाटा परिसरात महामार्गावरील झाडाखाली सावलीच्या विसाव्याला भेटले असता, त्यांची ते कर्म कहाणी सांगू लागले. या लाॅकडाउनमुळे नाशिक शहरात हाताला कामच नसल्याने  तिथे थांबुनही काय करायचे म्हणून आम्ही आमच्या गावी परत जात आहोत. जरी केंद्र व राज्य सरकारने घरी सोडण्याची व्यवस्था केली आहे. परंतु यासाठी नोंदणी करावी लागत आहे. त्याची माहिती नसल्याने आणि ऑनलाईन प्रक्रिया किचकट असल्याने त्यात  विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आम्ही पायी चालत जाण्यालाच प्राधान्य दिल्याचे कदम कुंटूंबीयानी सांगितले सांगितले आहे.

 

वेदना सांगायच्या कुणाला?
मालकांनी कामावरून काढून टाकल्यामुळे खिशात पैसे नाहीत, खायला अन्नधान्य नाही. हे दिवस जातील याची काही दिवस वाट पाहिली. परंतु लाॅकडाउन काही उघडले नाही. शेवटी पायी गावाकडे जात आहोत चालुन-चालुन पायाला गोळे व सूज आली. पण, या वेदना सांगायच्या कुणाला? आता एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली काहीही झाले तरी चालेल पण गावाकडे जाऊच.
सुहास कदम, नांदेड. कामगार
...
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT