Worshiper of knowledge is the true pike of the Buddha say Dalai Lama in Aurangabad 
मराठवाडा

ज्ञानाचा उपासकच बुद्धाचा खरा पाईक : दलाई लामा

योगेश पायघन

औरंगाबाद : जगातील सर्वांत प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारतीय संस्कृतीचा पाया ज्ञानावर आधारलेला आहे. अंहिसा आणि करुणा हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हे जुने ज्ञान आणि मूल्य बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया असून, हे ज्ञान घेऊन पुढे जाईल. तोच खरा बुद्धाचा पाईक असेल. असे मत प्रसिद्ध धम्मगुरु दलाई लामा यांना व्यक्त केले.

जागतिक बौद्ध धम्म परिषदेनिमित्त दलाई लामा शहरात आले असता त्यांनी शनिवारी (ता. 23) सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी परिषदेचे संयोजक तथा उद्योग सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

""मला एकदा चीनच्या पत्रकाराने विचारले की तुम्ही स्वतःला भारताचे पुत्र का म्हणवता? मी गेली साठ वर्ष भारतात वास्तव्याला आहे. माझे मन हे नालंदा विचारसरणीशी एकरूप झाले आहे. आता, आमच्यातही भारतीयत्व रुजलेले आहे. लडाखमध्ये एका परिषदेत एक मुस्लीम इमाम म्हणाले, की आपण सर्व अल्लाहची मुले आहोत. अल्लाह सर्वांवर सारख प्रेम करतो. त्यांचे हे बोल मला फार आवडले. आपण बुद्धांना महात्मा म्हणतो. महात्मा म्हणजे महान आत्मा पण बुद्धाच्या शिकवणीत आत्माला या संकल्पनेला स्थान नाही. बुद्ध हे केवळ मानवतेचे महान प्रतीक आहेत. अशा शब्दांत दलाई लामा यांनी संकल्पना स्पष्ट केल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माचा स्वीकार करून 1956 मध्ये समाजाला दिशा देण्याचे काम केले. ते या देशातील जातिव्यवस्थेच्या चुकीच्या प्रथेविरोधात मोठे पाऊल होते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. 

बुद्धाकडे शिक्षक म्हणून पहा

जगाने बुद्धाकडे केवळ धम्माचा संस्थापक म्हणून न पाहता, शिक्षक म्हणून पहावे. माझी शिकवण केवळ श्रद्धेपोटी स्वीकारू नका. ती आत्मसात करून अंगीकारा असे बुद्ध सांगतात. "फक्त बुद्धंम शरणंम गच्छामी...' चा जप करून कोणी बुद्धाचा अनुयायी होत नसतो. हे त्यांनी आवर्जून नमूद केले. 
 
चीन प्रचंड भ्रष्टाचारी

वेगवेगळ्या राजकीय विचारसरणी असतात. त्या अनेकदा समाजातील स्थैर्य बिघडवतात. जसे की, समाजवादाच्या पायावर चीन उभा राहीला. पण, तिथेही आज प्रचंड भ्रष्टाचार आहे. रशियातही हेच सुरू आहे. कार्लमार्क्‍स थोर माणूस, पण लेनीनने हिंसेच्या विचारधारेने साम्यवादाला भ्रष्ट केले. या उलट माझे मित्र आणि इस्राईलचे माझी राष्ट्राध्यक्ष शिलॉंग पेरेस यांची समाजवादावरची श्रद्धा मला भली वाटले. 

सर्व धर्मांमध्ये बुद्धांचा गौरव

हिंदू संस्कृतीत गौतम बुध्दांना विष्णूचा नववा अवतार मानले जाते. याबद्दल तुम्हाला काय वाटते असे विचार असता ते म्हणाले, ""असे असूही शकते. हिंदू संस्कृतीवरही दोन-अडीच हजार वर्षे बुद्धांच्या शिकवणीचा प्रभाव आहेच. प्रत्येकाची परिभाषा वेगळी असली तरी सर्वच धर्मांत हिंदू, ख्रिस्ती, मुस्लिम, ज्यू अशा सर्वच धर्मामध्ये बुद्धांच्या शिकवणीचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा अंगीकार केलेला आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT