X rays of Swami Ramanand Tirtha Hospital at Ambajogai are closed causing great inconve nience to patients 
मराठवाडा

स्वारातीत बंद एक्सरे यंत्राअभावी रुग्णांची गैरसोय ; रुग्णांवर खासगी रुग्णालयात जाण्याची आली वेळ

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (बीड)  : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील काँप्युटराइज्ड रेडिओग्राफी सिस्टीम (सीआरएस) हे यंत्र (एक्सरे) बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यायी रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. रुग्णालय प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून ही गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्णांचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल काँप्युटराइजड एक्सरे मशीन आहे. परंतू ही मशीन आठ वर्षाची जुनी असल्याने ती मागील आठ दिवसापासून बंद पडली आहे. त्यामुळे रुग्णांना केवळ एक्सरेसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. पर्यायी गरीब रुग्णांना आर्थिक  झळही सहन करावी लागत आहे.

आशिया खंडातील पहिले ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या या रुग्णालयात आठ-आठ दिवस एक्सरे सुविधा बंद पडत असेल तर हे किती मोठे दुर्दैव म्हणावे लागेल ? या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज एक ते दीड हजार रुग्णांची तपासणी होते. त्यातील विविध आजारांच्या रुग्णांचे निदान करण्यासाठी एक्सरे काढावे लागतात, अपघात विभागात तर अनेक अत्यवस्थ रुग्ण दाखल होतात. त्यात काही रस्ता अपघाताचेही रुग्ण असतात. अशा रुग्णांना तर एक्सरे काढणे अती आवश्यक असते. आता तेवढ्यासाठी या रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता पहावा लागत आहे.  

दुरुस्तीचा प्रयत्न 

रुग्णालय प्रशासनाने संबंधीत कंपनीच्या मेकॅनिकलला बोलावून ही एक्सरे मशीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतू या मशीनला दुरुस्त करण्यातच नवीन मशीन इतका खर्च येत आहे. त्यामुळे नवीन मशीनच घेण्याच्या विचारात रुग्णालय प्रशासन आहे. 

नवीन यंत्राचा प्रस्ताव

स्वाराती महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुत्रे हे रजेवर असल्याने प्रभारी अधिष्ठाताचा पदभार डाॅ. एस. एस. धपाटे यांच्याकडे आहे. त्यांनी याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.  लहाने यांच्याशी चर्चा केली, असून दोन दिवसात नवीन एक्सरे मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना त्यांनी केल्या असल्याचे डाॅ. धपाटे यांनी सांगितले. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात नवीन यंत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT