file photo 
मराठवाडा

महिलेसोबतचे सुत महागात पडले..अन् पुढे असे घडले...

हाफीज घडीवाला

कंधार (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील मंगनाळी येथे अनैतिक संबंधातून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (ता. १२) उघडकीस आली. याबाबत पोलिस ठाण्यात प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बळीराम संभाजी शिंदे (वय ३३) रा. मंगनाळी (ता. कंधार) याचे याच गावात राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. हा प्रकार तिच्या घरच्या मंडळीना समजला. यावरून बळीराम शिंदे याचा काटा काढण्यासाठी त्यांनी कट रचला. रविवारी (ता. आठ) डिसेंबर रोजी बळीराम शिंदे गावात आला. त्या वेळी त्याच्या घरी त्याची बहीण होती. त्याने घरात बॅग ठेऊन शौचालयाला जातो म्हणून घरा बाहेर पडला, परंतु तो परत आला नाही. यानंतर शोध घेतला असता तो कोठेही सापडला नाही. दरम्यान गुरुवारी (ता. १२) सकळी आठच्या सुमारास मंगनाळीच्या पूर्वेस १२ किलो मिटर अंतरावरील जयवंता अभंगे यांच्या शेतात बळीराम शिंदे याचा मृतदेह आढळुन आला. याप्रकरणी पोलिस पाटील यांच्या माहितीवरून कंधार पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.

आरोपींतानी गु्न्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी घटना्स्थळी जावून पाहणी केली. यावेळी बळीराम शिंदे याचा मारहाणीत खून झाल्याची प्राथमीक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानतंर त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत व फिर्यादीच्या तक्रारीवरून मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींतानी गु्न्हा केल्याची कबुली दिली.

मयताच्या सासऱ्याची तक्रार

मयत बळीराम शिंदे यांचे सासरे नारायण वडजे (रा. कारला ता. नायगाव) यांनी या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द खूनाची फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन मारोती रामा अभंगे, मन्मथ रामा अभंगे व लक्षमीबाई अभंगे यांच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला. कंधार पोलिसांनी या तिघांना अटक केली. त्यानंतर शुक्रवारी ( ता.१३) तिघांना कंधार न्यायालयापुढे उभे केले असता न्यायाधिश ल. मु. सय्यग यांनी तिघांनाही 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाटविले. पोलिस उपनिरीक्षक स्वर्णा उमाप तपास करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० वर्षांपूर्वीचे 'ते' पत्र अखेर सापडले, शिक्षकांच्या निवडश्रेणीचा मार्ग मोकळा, पत्रात नेमकं काय लिहिलंय?

लोहगडावर पर्यटकांची वाढती गर्दी; केतन अग्रवाल प्रकरणामुळे घटनास्थळ ठरतंय आकर्षण

रेल्वेत 'पहिले या, पहिले निवडा' तत्त्वावर नोकरी मिळणार! मुंबई ते सूरतदरम्यान 175 पदांची भरती होणार; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

Satara farmers: आत्मनिर्भरतेकडे शेतकऱ्यांची मोठी झेप; २५ हजार क्विंटल घरगुती सोयाबीन बियाण्यांची निर्मिती, साताऱ्यात शेतकऱ्यांची नवी क्रांती!

Maharashtra Housing Rules: सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवे नियम २०२६ जाहीर; स्वयं-पुनर्विकासासाठी जमिनीच्या १० पट कर्जमर्यादा, थकीत वसुलीसाठी कडक तरतुदी

SCROLL FOR NEXT