This year, Diwali should be celebrated in a simple manner and by following the guidelines, appealed District Collector Ruchesh Jayavanshi. 
मराठवाडा

हिंगोली : मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन दिवाळी साजरी करावी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोना महामारीमुळे उद्‍भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, यावर्षी दिवाळीचा सण नागरिकांनी साध्या पध्दतीने व मार्गदर्शक सुचनांचे पालन करून साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्वधर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. त्यामुळे या वर्षीचा दीपावली उत्सव कोरोना कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणे पूर्ण खबरदारी घेऊनच अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा. अद्यापही धार्मिकस्थळे खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दीपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादितच राहील याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. 

उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांना घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, दीपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनीप्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दीपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी फटाके फोडण्याचे टाळावे, त्याचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा. या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम यात दीपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नये. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक आदी माध्यमांव्दारे त्यांचे प्रसारण करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. 

हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, दिवाळीचा सण साजर करत असताना नागरिकांनी एकाचवेळी मोठया प्रमाणावर एकत्रित येऊ नये. सर्वांनी यासाठी सहकार्य केल्‍यास रोगाचा प्रसार रोखण्‍यास फार मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.


संपादन - सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT