Gas Cylinder Blast News
Gas Cylinder Blast News esakal
मराठवाडा

जीवाची परवा न करता बहिणीला वाचवले, पण... कमावत्या भावाचा गेला जीव

सकाळ डिजिटल टीम

धारुर (जि.बीड) : दुपारची वेळ होती. शेतात असलेल्या घरात अचानक आग लागली. घरात असलेल्या बहीण व दोन मुलांना वाचविण्यासाठी तरुण प्रयत्न करत होता. दरम्यान आगीने रौद्र रुप धारण केल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder Blast) झाला. तरुणाने बहीण व दोन मुलांना वाचवले. मात्र यात त्याचा होरपळून मृत्यू झाला. पिंपरवाडा (ता.धारुर) येथे मंगळवारी (ता.२९) ही हृदयद्रावक घटना घडली. रवी श्रीधर तिडके (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे. पिंपरवाडा येथे शेतात असलेल्या घरात बहीण स्वाती मुंडे ही भाऊ रवीसाठी स्वयंपाक बनवत होती. यावेळी चुलत्याची दोन मुले घरात होती. स्वयंपाक करताना गॅस लिकेज झाला. (Young Man Died Due To Gas Cylinder Blast In Dharur Of Beed)

बहिणीने रवीला मदतीसाठी आवाज दिला. मात्र तोपर्यंत आग लागली होती. बहिणाच्या पायाला जखम असल्याने तिला घराबाहेर पळता येत नव्हते. रवी घरात पळत गेला व त्याने दोन मुलांना बाहेर काढले. त्यानंतर बहिणीला उचलून बाहेर आणले. मात्र घरातील इतर साहित्य वाचविताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यात रवीचा मृत्यू झाला. आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या प्रकरणी धारुर येथील पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. (Beed)

आठ दिवसांपूर्वीच घरी आला होता रवी

रवीकडे ट्रॅक्टर होते. तो ऊस घेऊन साखर कारखान्यावर गेला होता. आठ दिवसांपूर्वीच रवी घरी आला होता. घरात तो कमावता व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT