Osmanabad Umarga Crime News
Osmanabad Umarga Crime News 
मराठवाडा

शवविच्छेदन केल्यानंतर पुन्हा स्मशानभूमीतच दुसऱ्यांदा शवविच्छेदन, उमरग्यातील तरुणाचा मृत्यू की घातपात?

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील गुंजोटी येथील एका वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्याच्या हौदात सापडल्याचा प्रकार सोमवारी (ता.२२) उघडकीस आला आहे. दरम्यान त्याच्या तोंडावर व डोक्यावर जखमा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदन केल्यानंतर सरणावर झोपवलेल्या मृतदेहाचे स्मशानभूमीतच दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात आले.


या बाबतची माहिती अशी की, गुंजोटी येथील कमलाकर गुंडू माने (वय ३०) हा तरुण ता.१९ फेब्रुवारीला दिवसभर शिवजयंती महोत्सव साजरा करुन सायंकाळी घरी गेला होता. जेवण करून परत तो रात्री शेताकडे जातो असे सांगून मित्रांसोबत गेला. तीन दिवसांपासून तो घरी परतला नसल्याने त्यांचा भाऊ जोतीराम गुंडू माने यांनी सोमवारी पोलिस ठाण्यात माझा भाऊ चार दिवसांपासून घरी आलेला नाही तो बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचे अर्ज केला होता. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आणि एका तासात उमरगा - गुंजोटी मार्गालगत असलेल्या जून्या इमारतीतील पाण्याच्या हौदात एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.

मृताच्या तोंडावर, डोक्याला व कानाच्या पाठीमागे जखमा असल्याची माहिती सांगण्यात आली. हा घातपात असल्याचा संशय असल्याचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.गरड यांनी शवविच्छेदन केले. मात्र घातपाताचा तपास करुन आरोपीला अटक करण्याची मागणी करत शवविच्छेदन केलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी विरोध केला. मात्र प्रशासनाने सर्वांची समजून काढून मृतदेह ताब्यात दिला.

त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला व गुंजोटीच्या स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्काराची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. सांयकाळी सात वाजता मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगून अंत्यसंस्कार रोखण्यात आले. पहिल्यांदा शवविच्छेदन झालेले असताना दुसऱ्यांदा कशासाठी ? असा प्रश्न करून ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. परंतु डॉक्टराने स्मशानभूमीतच मृतदेहातील विशिष्ट नमुन्याचे शॅम्पल घेतले. या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार व्ही. के. मुंडे तपास करीत आहेत.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकिय अधिकारी श्रीमती डॉ. गरड यांनी केले. तरुणाचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याची माहिती होती. मात्र त्यात मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होत नव्हते. पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी मृत्यूच्या नेमक्या कारणासाठी पुन्हा शॅम्पल घेण्याचे सांगितले. डॉक्टरांनी वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्मशानभूमीत शरीरातील विशिष्ट प्रकारचे शॅम्पल घेतले आहे.
- डॉ. अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT