MPSC Motivational Story Esakal
Mpsc Upsc Articles

MPSC Motivational Story: नरवटवाडीच्या एका शेतकऱ्याचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी...

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मोठ्या जिद्दीने एका शेतकरी कुटुंबातील मुलाने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.

दिपाली सुसर

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मोठ्या जिद्दीने एका शेतकरी कुटुंबातील मुलाने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. विलास बळीराम नरवटे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मेरिट लिस्ट मध्ये महाराष्ट्रात 33 तर एनटीसी प्रवर्गातुन महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आल्याने त्यांची उपजिल्हाधिकारी या पदावर निवड होत असल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विलास याचे वडील बळीराम पांडुरंग नरवटे हे शेतकरी असून त्यांची आई कलावतीबाई देखील शेतीच करतात या दोघा नवरा बायकोनी प्रचंड काबाड कष्ट करून मिळेल ते काम करून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी हातभार लावला. 

त्यानंतर विलास यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पुणे शहरात राहणे व अभ्यासाचा खर्च मोठ्या प्रमाणात होता. घरची परिस्थिती हलाकीची होती कारण घरचा सर्व कारभार शेतावर अवलंबून होता.पुढे मग विलास यांचे मोठे भाऊ जिजाराम यांना पोलीस दलात नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेऊन आपल्या पगारातून काही पैसे विलास यांना दर महिन्याला खर्चासाठी द्यायचे.

2020 मध्ये विलास यांना सहकार विभागात सहायक निबंधक म्हणून नोकरी मिळाली होती तरी सुद्धा विलासने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे सुरूच ठेवले व मंगळवारी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मेरीट लिस्टमध्ये विलास नरवटे यांचा महाराष्टात रँक 33 तर एनटीसी प्रवर्गातुन प्रथम क्रमांक आला आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विलास नरवटे सांगतात की, मी उपजिल्हाधिकारी या पदापर्यंत पोहचण्याकरता मी मेहनत तर केलीच पण स्वतःच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास ठेवून झपाटून अभ्यास करणे हा माझ्या यशाचा खूप साधा फंडा होता. जिवनापेक्षा मोठ काहीच नाही ही खुणगाठ मी मनाशी पक्की बांधलेली होती.

मला माझ्या  संभाषण कौशल्यावर प्रचंड आत्मविश्वास होता की मी मुलाखतीमध्ये माझी मॅच काढु शकतो. मी मनात पक्क ठरवलं होत की जरी ही आपल्या अधिकारी होण्याची ही जरी शेवटची संधी असली तरी आयुष्यातील शेवटची संधी नाही आहे.त्यामुळे मी मनात प्रंचड सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन मुलाखतीला सामोरो गेलो आणि यशस्वी झालो. पुढे ते सांगतात की तुम्हाला मिळालेल्या पोस्टपेक्षा अधिक महत्त्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही त्या पोस्टवर राहुन प्रत्यक्षात काम कस करता  त्यातून किती लोकांना फायदा होतो याचा देखील विचार होणे गरजेचे आहे.

आता MPSC परिक्षेच्या तयारी करणाऱ्या मुलामुलींना ते सांगतात की, परिक्षा देतांना तुमच्या मनात तुमच्याविषयी सकारात्मक विचार ठेवून परिक्षा घ्यावी, जर समजा ती पोस्ट नाही निघाली तर रडत न बसतात दुसऱ्या पोस्टकरता लगेच अभ्यास सुरु करावा कारण तुम्हाला तुमच्या मेहनतीने जी कोणती पोस्ट मिळते ती माझ्यासाठी उत्तम आहे हा विचार करून, मिळाले यश हाताशी घेऊन पुन्हा अभ्यास करावा असे ते सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT