मुंबई

पनवेलकरांनो १० दिवसांचं सामान भरून ठेवा, कडकडीत लॉकडाऊन झालाय घोषित; 'या' आहेत तारखा...

सकाळवृत्तसेवा

पनवेल : पनवेल पालिका हद्दीतील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका क्षेत्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. 3 जुलै रात्री 9 पासून सुरु होणार असलेला  लॉकडाऊन 13 जुलै पर्यंत कायम राहणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

पनवेल पालिका हद्दीतील कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आकडा 2 हजार वर पोहचला असून, बुधवारी सापडलेल्या 136 नव्या रुग्णांमुळे पालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2277 झाली आहे.

दिवसेंदिवस रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीमुळे रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत पालिका हद्दीतील नागरिक व लोकप्रतिनिधी व्यक्त करत असल्याने ज्या प्रमाणे नवी मुबंई आणि ठाणे महापालिकेने लॉकडाउनच निर्णय घेत लॉकडाउनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी सुरु केली आहे त्याप्रमाणे पनवेल पालिका हद्दीत देखील पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असल्याची माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे. 

एकूण रुग्ण - 2277
बरे झालेले रुग्ण - 1392
विद्यमान रुग्ण - 808
मृत्यू - 77

नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ज्या पद्धतीने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे त्याच पद्धतीने पनवेल पालिकाहद्दीत देखील लॉकडाऊनचे पालन केले जाणार असल्याने औषध दुकाने तसेच दूध विक्री केंद्र वगळता इतर सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुले लॉकडाऊन काळात पुढील 10 दिवस पुरेल इतका जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, किराणा सामान तसेच औषधांचा साठा पुढील 2 दिवसात कोणतीही गर्दी न करता साठवण्याचं आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

मोठी बातमी - 'डॉक्टर्स डे' निमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं सर्व डॉक्टरांसाठी भावनिक पत्र...

3 जुलैला रात्री 9 वाजल्यापासून ते 13 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. पालिकाक्षेत्रातील कंटेन्मेंट झोनमध्ये अधिक प्रभावीपणे लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात येणारेत. कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन असणार आहे.

10 days strict lockdown will be followed in panvel from 3rd to 13th july

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

India Squad for T20 World Cup 2026: संजू-अभिषेक ओपनिंगला, रिंकू सिंग फिनिशर; वर्ल्ड कपसाठी भारताची तगडी Playing XI, थरथर कापतील प्रतिस्पर्धी...

झी मराठीची मोठी घोषणा! पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार वाहिनीवरील दोन गाजलेल्या मालिका; वाचा तारीख आणि वेळ

नवीन वर्षात स्लिम व्हायचं स्वप्न? वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या 10 गोल्डन टिप्स

Nashik Municipal Election : भाजपचा 'मिशन १०० प्लस'चा प्लॅन; नाशिकमध्ये उमेदवारीसाठी आता त्रिस्तरीय सर्वेक्षण सुरू!

SCROLL FOR NEXT