corona testing 
मुंबई

खबरदारी म्हणून कंपनीने कोरोना चाचणी केली अन् तब्बल 'इतके' कर्मचारी निघाले पॉझिटिव्ह; वाचा सविस्तर...

सुनील पाटकर

महाड : महाड शहर व औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत चालला असून शहरातील एक खाजगी डॉक्टरसह तालुक्यातीत सोळा जणांना कोरोना लागण झाली आहे. विशेष म्हणजे महाड औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक मधील कामगार आणि त्यांचे कुटुंबिय अशा दहा जणांचा यात समावेश आहे. 

औदयोगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑरगॅनिक्स कारखान्याच्या व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसह त्यांच्या कुटुंबाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील काहींची चाचणी करण्यात आली असून त्याचे अहवाल आज प्रप्त झाले. त्यामध्ये देशमुख कांबळे येथे राहणारा कामगार, त्याची पत्नी आणि वडिल त्याचप्रमाणे याच गावात राहणाऱ्या तीन कामगारांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच इसाने कांबळे शिंदे कोंड येथे राहणारे दोन, पोलादपूर येथे राहणारा एक आणि चांभारखिंड (महाड) येथे राहणाऱ्या सहा कामगारांचे अहवाल देखील पॉझिटीव्ह आले आहेत.

महाड शहरातील एका खासगी डॉक्टरला दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी ते कोरोनामुक्त झाले होते. लाडवली, वाळव व पोलादपूर तालुक्यातील माटवण,  येथील प्रत्येकी एका रुग्णाला कोरोना संसर्ग झाला आहे. पोलादपूर येथील एका इसमाचा स्वॅब महाड येथून पाठविण्यात आला होता. त्यामुळे त्याची नोंद महाडमध्ये करण्यात आली आहे. महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये कोरूना चा संसर्ग वाढू लागत असल्याने सर्व कंपन्यांनी आपले अधिकारी व कामगारांच्या तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भास्कर जगताप यांनी केले आहे
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

11 Fours, 2 Sixes... रिंकू सिंगचं सलग दुसरं शतक! आता तरी टीम इंडियात पुन्हा जागा मिळणार का?

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

SCROLL FOR NEXT