mira bhayandar 
मुंबई

चिंताजनक! मिरा-भाईंदरमध्ये 24 तासात 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण

सकाळवृत्तसेवा

मिरारोड : मिरा-भाईंदर शहरात शनिवारी नव्याने 10 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये आता एकूण रुग्णसंख्या 69 झाली असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरातील मिरा रोडमधील नयानगर मध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. आज भाईंदर पश्चिमेकडील शिवसेना गल्लीत तब्बल पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 18 वर्षीय तसेच 11 वर्षीय मुलाचा समावेश आहे. त्याचबरोबर 44 वर्षीय व 33 वर्षीय महिला व 54 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर मीरा रोडच्या पूनम सागर येथील 42 वर्षीय पुरुष, मंगल नगर येथील 58 तसेच 21 वर्षीय पुरुष तर साईबाबा नगर येथील 49 वर्ष पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान भाईंदर पश्चिमेकडील उत्तन मोठा गावात 37 वर्ष महिला कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.

ठाण्यात 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू

ठाण्यातील गार्डन इस्टेट परिसरात राहणाऱ्या ५७ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ठाण्यातील कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. गेल्या सहा दिवसांपासून ५७ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीवर होरायझन रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्टरी नव्हती. या रुग्णाला यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर आता कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ह्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची माहिती महापालिकेच्या वतीने जमा केली जात आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरनटाईन व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत ११५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

10 new corona positive case in mirabhayndar within 24 hours

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

Latest Marathi News Updates : - देशभक्तीचा व्यापार केला जातोय- उद्धव ठाकरे

Hingoli News: अडीच तासांची थरारक प्रतीक्षा; पुरात अडकलेल्या युवकाला ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचवले

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

SCROLL FOR NEXT