corona 
मुंबई

सर्वात धक्कादायक बातमी! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त अचानक झाले बेपत्ता; प्रशासनाकडून शोधाशोध सुरु

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल २१ हजारांवर गेला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसमोर रुग्णसंख्या कमी करण्याचं मोठं आव्हान आहे. मात्र असं असताना देखील मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडलाय. 

मुंबईत तब्बल १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अचानक गायब झाल्यामुळे मोठं संकट उभं  ठाकलं आहे. त्यात हे सर्व रुग्ण पॉझिटिव्ह असल्यामुळॆ त्यांच्यामुळे इतरांनाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहे. इतक्या मोठ्या मुंबईत या अचानक बेपत्ता झालेल्या कोरोना रुग्णांना शोधून काढणं हे काही सोपं काम नाहीये. त्यामुळे सामान्य मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.  

कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी येणारा सस्पेक्टेड रुग्ण फोन नंबर, पत्ता अशा गोष्टी भरताना अनेक चुका करतात तर काही जण यात खोटी माहिती भरतात किंवा टेस्टिंग लॅबमध्ये कर्मचाऱ्यांकडून ही माहिती भरताना चूका होतात. त्यामुळे एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्याचा शोध घेणे कठीण होते, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

मुंबईमधून १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गायब झाले आहेत. त्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांना शोधणं कठीण झालं  आहे. अशा लोकांना ट्रॅक करण्याचे अन्यही मार्ग आहेत. बांद्र्याच्या एका कंपनीनं कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती. मात्र पत्ता देताना बांद्रा पूर्व असा उल्लेख केला होता. मात्र ही कंपनी पश्चिमेची होती. अशा बेपत्ता लोकांची नावं पाठवून मुंबई महापालिकेनं आधार कार्डचे डिटेल्स मागविले आहेत असंही सुरेश काकाणी यांनी म्हंटलंय.   

विक्रोळीच्या एन वॉर्डमध्ये कोरोनाचे १२ रुग्ण बेपत्ता झाले आहेत. अधिकारी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. खासगी लॅबमधले सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. अंधेरी पूर्वमध्ये तर २७ जण बेपत्ता झाले आहेत तर  धारावीमध्ये तर २९ जण बेपत्ता झाले आहेत. मात्र यापैकी काही जणांना शोधण्यात यश आलंय अशी माहिती सहायक आयुक्त प्रशांत सपकाळ यांनी दिली आहे. 

100 plus corona positive patients missing in mumbai read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT