मुंबई

राज्यात कोरोनाचा भडका; एका दिवसात 1000 नवीन रुग्णांची भर! वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: आज राज्यात कोरोना बाधित रुग्णांनी उच्चांंक गाठला असून दिवसभरात 1008  नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 11,506 झाली आहे. तर आज 26 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा पावणे पाचशे वर पोहोचला आहे.

आज राज्यात 26 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी पुणे शहरातील 10,मुंबईचे 5, जळगाव जिल्ह्यातील 3 तर पुणे जिल्ह्यातील 1, सिंधुदुर्ग मधील 1, भिवंडी महानगरपालिकेतील 1, ठाणे मनपामधील 1, नांदेड मधील 1, औरंगाबाद मनपामधील 1 तर 1 मृत्यू परभणी येथील आहे.  या शिवाय उत्तर  प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. 


आज झालेल्या मृत्यूंपैकी 18 पुरुष तर 8 महिला आहेत. आज झालेल्या 26 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14  रुग्ण आहेत तर 11  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक जण 40 वर्षांखालील आहे.  या 26 रुग्णांपैकी 15 जणांमध्ये (58 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 485  झाली आहे. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,53,125 नमुन्यांपैकी 1,40,587 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 11,506 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज राज्यात 106  रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 1879 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 792 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 10,849 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 45.34 लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

आजपर्यंत राज्यातून  1879 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1,63,026 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 11,677 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT