mumbai police 
मुंबई

बापरे! मुंबईत दोन दिवसात तब्बल 'इतक्या' पोलिसांना कोरोनाची लागण; आज आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई:  मुंबईत शुक्रवारी आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील मृत पोलिसांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. दुर्दैवाने गेल्या दोन दिवसात 102 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

मृत 55 वर्षीय पोलिस हवालदार ताडदेव वाहतुक विभागात कार्यरत होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. एल्फिन्स्टन येथील रहिवासी असलेले पोलिस हवालदार परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या श्वास घायला त्रास होत असल्यामुळे 9 जूनला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी त्यांना कोणताही गंभीर आजार नव्हता.

त्यांना कोरोना कोणाच्या संपर्कात आल्यामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या संपर्कातील इतर पोलिसांना घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. गेल्या सात दिवासात 9 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या दोन दिवसात 102 पोलिसांना  कोरोनाची बाधा झाली आहे. 

मुंबईत आतापर्यंत 2349 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. पण कोरोनावर मात करणा-या पोलिसांचा आकडा मोठा आहे. सुमारे 65 टक्के पोलिसांनी कोरोनावर मात केली आहेत. त्यातील अनेक पुन्हा सेवेत रूजू झाले आहेत. तर उर्वरीत नियमानुसार घरीच क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत पोलिसांसाठी चार कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय इतर प्रतिबंधात्मक साहित्य व औषधांचे वाटपही पोलिसांना करण्यात आले.

102 police are corona positive in last 2 days in mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT