मुंबई

मोठी बातमीः राजभवनात कोरोनाचा शिरकाव, राज्यपालांची चिंता वाढली

मिलिंद तांबे

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबई शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट आहे.  त्यातच आता मुंबईतल्या राजभवन येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची चिंता वाढली आहे. शनिवारी, राजभवनात काम करणाऱ्या जवळपास १४ जणांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. तसंच या आठवड्याच्या सुरुवातीला दोन जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 

मुंबई महापालिकेनं अद्याप राजभवनाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलं नाही आहे. राजभवनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं या वृत्ताची पुष्टी केली असून पुढच्या १५ दिवसात राजभवनावर कोणतीही बैठक होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 

 राजभवनात एकूण 100 कर्मचारी आहेत. त्यापैकी 40 जणांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 14 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झालंय.  60 कर्मचाऱ्यांचा अहवाल येणं बाकी आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी तर काही पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सर्वात आधी एक वायरमॅन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याची पहिल्यांदा चाचणी करण्यात आली होती. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेत राजभवनात अधिकारी/कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती. त्यानुसार राजभवनात एका संशयित इलेक्ट्रिकल शाखा अभियंताची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर 14 जणांना लागण झाल्याचे समोर आले. लागण झालेले सर्व कर्मचारी राजभवनातील स्टाफ क्वार्टरमध्ये राहतात.

दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लागण झाला नाही. खबरदारी म्हणून राज्यपाल स्वत: क्वारंटाउन राहत आहे.

संपादन- पूजा विचारे

16 staffers test Covid positive Raj Bhavan Governor quarantine

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT