मुंबई

1.68 टक्के मुंबईकरांना कोरोनाची लागण; BMCने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट

समीर सुर्वे

मुंबई: मुंबईतील सरासरी 1.68 टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून मुलुंड टी प्रभागातील 2.92 टक्के, ग्रॅन्टरोड, मलबार हिल डी प्रभागातील 2.87 टक्के, तर कुलाबा ए प्रभागातील 2.83 टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे मुंबई महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे. 

मुंबई महापालिकेच्या पर्यावरण स्थिती दर्शक अहवालात मुंबईची प्रभागनिहाय 2019 ची लोकसंख्या प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर पालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाकडून दररोज प्रभागनिहाय कोरोनाची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. पर्यावरण स्थिती दर्शक अहवालानुसार 2019 ची मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 28 लाख असून मुंबईत 9 ऑक्‍टोबरपर्यंत 2 लाख 16 हजार 858 कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. 
लोकसंख्येच्या तुलनेत टी प्रभागात कोरोनाची सर्वाधिक रुग्ण आहे. या प्रभागातील 2.92 टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. येथील लोकसंख्या 3 लाख 53 हजार 343 असून त्यापैकी 10 हजार 324 रुग्ण आढळले आहेत. टी प्रभागाखालोखाल डी प्रभागातील 3 लाख 58 हजार 933 लोकसंख्येपैकी 10 हजार 313 नागरिकांना कोरोना झाला आहे; तर ए प्रभागात 5 हजार 423 रुग्ण आढळले असून तेथे 1 लाख 91 हजार 450 लोकसंख्या आहे. 

लोकसंख्येच्या तुलनेत संसर्गाची टक्केवारी 
प्रभाग                                   टक्केवारी 

कुलाबा ए                                2.83 
मलबार हिल, ग्रॅन्टरोड डी            2.87 
लालबाग परळ एफ दक्षिण           2.41 
वरळी प्रभादेवी जी दक्षिण             2.19 
वांद्रे, सांताक्रूझ, खार एच पश्‍चिम   2.32 
मुलुंड टी                                   2.92 
बोरिवली आर मध्य                      2.57 
गोरेगाव पी दक्षिण                        1.68 
कांदिवली आर दक्षिण                  1.71 
मरिन लाईन्स गिरगाव सी              1.84 
भायखळा माझगाव ई                   1.95 
दादर, माहीम धारावी जी               1.85 
अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम 1.78 

मृत्युदर जास्त, पण रुग्णसंख्या कमी 
कुर्ला एल प्रभागाचा मृत्युदर 6.05 टक्के आहे. मात्र, येथे लोकसंख्येच्या तुलनेने बाधित रुग्णांचे प्रमाण केवळ 0.89 टक्के आहे. या प्रभागात 9 लाख 33 हजार 611 लोकसंख्येपैकी 8 हजार 352 जणांना कोरोना झाला. तसेच गोवंडी, देवनार एम पूर्व प्रभागाचा मृत्युदर 5.05 टक्के आहे. मात्र या प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेने संसर्गाचे प्रमाण मुंबईत सर्वात कमी आहे. येथील संसर्गाचा दर अवघा 0.84 टक्के आहे. या प्रभागाची लोकसंख्या 8 लाख 35 हजार 819 असून 7 हजार 88 रुग्ण आढळले आहेत. 

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT