रेल्वेच नाही विमानांतही गर्दी; सहा दिवसांत एवढ्या लोकांनी सोडली मुंबई 
मुंबई

रेल्वेच नाही विमानांतही गर्दी; सहा दिवसांत एवढ्या लोकांनी सोडली मुंबई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने, मुंबईत अडकलेल्यांनी आपल्या गावी, राज्यात जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, फक्त श्रमीकांसाठीच इतर राज्यात जाण्याची परवानगी असल्याने अनेकांची अडचण झाली होती. 25 मे रोजी देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्याने मुंबई बाहेर पडणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर सुमारे 22 हजार 848 जणांनी विमानाद्वारे मुंबई सोडल्याचे दिसून आले आहे.

देशभरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 22 मार्च पासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकानेच सुरू ठेवण्यात आले आहे. दैनंदिन मुंबईत वाढती कोरोना बाधीतांची संख्येने नागरिकांना हैराण केले आहे. त्यामध्ये हाताला काम नाही. रोजगार बंद पडला, नौकऱ्या सुटल्या त्यामूळे भाड्याच्या घराचे भाडे तरी कसे भरायचे असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला होता. 

अशा परिस्थितीत फक्त राज्यभरात अडकलेल्या मजुरांनाच त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी श्रमीक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली होती. तर इतर अडकलेल्या नागरिकांना त्यामध्ये प्रवासाची सुविधा नव्हती, त्यामूळे 25 मे पासून सुरू झालेल्या विमानसेवेचा सर्वात जास्त फायदा मुंबई बाहेर पडणाऱ्यांनी घेतला आहे. सहा दिवसात सुमारे 291 विमानांनी ये-जा केली असून, एकूण 30 हजार 371 प्रवाशांनी त्यामध्ये प्रवास केला आहे. मात्र यामध्ये मुंबई सोडणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असून, मुंबईत येणाऱ्यांची संख्या फक्त 7523 येवढीत आहे. 

सहा दिवसांची आकडेवारी
एकूण प्रवासी - 30371
मुंबईबाहेर गेलेले - 22848
मुंबईत आलेले - 7523
एकूण विमाने - 291 
रद्द विमाने - 3

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

Uddhav Thackeray : सरकारने दिलेले पॅकेज ही शेतकऱ्याची थट्टा- उद्धव ठाकरे!

Autism Success Story: आईच्या साथीनं आणि जिद्दीनं बदललं आयुष्य! ऑटिझमवर मात करून 'सोहम'ने घडवली स्वतःची ओळख

Marathi Rangabhoomi : मराठी रंगभूमी दिन अमेरिकेत साजरा! 'गढीवरच्या पोरी' नाटकाने सॅन फ्रान्सिस्कोतील नवीन ब्लॅकबॉक्स थिएटरचा प्रारंभ

SCROLL FOR NEXT