File Photo 
मुंबई

‘मूड इंडिगो’मध्ये २३० कार्यक्रमांची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आशियातील सर्वात मोठा कल्चरल फेस्टिव्हल समजल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईच्या ‘मूड इंडिगो’ची सुरुवात गुरुवारपासून (ता. २२) होत आहे. २६ ते २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये २३० पेक्षा अधिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

यामध्ये देशी, विदेशी कलाकारांचे कॉन्सर्ट, चर्चासत्र व विविध स्पर्धांचा समावेश आहे.
आयआयटी मुंबईमध्ये होणाऱ्या ४९ व्या मूड इंडिगोमध्ये देशातील १७०० महाविद्यालयातील १ लाख ४३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या मूड इंडिगोमध्ये कलाकार अमित त्रिवेदी, शंकर एहसान लॉय, प्रीतम, आशा भोसले, विशाल शेखर, सलिम सुलेमान, सोनू निगम, कैलाश खेर यांचे कॉन्सर्ट होणार आहे; तर परदेशातील द हकेन, पोर्कुपाईन ट्री, सिम्पल प्लॅन आणि डीजे विनाई यांचे कॉन्सर्ट होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देशीबरोबरच विदेशी संगीतकारांच्या गाण्यांचा अनुभव घेता येणार आहे.

त्याचप्रमाणे लिटफेस्टमध्ये पी. चिदंबरम, नारायण मूर्ती, अर्णब गोस्वामी, देवेंद्र फडणवीस, बॉलीवूड अभिनेते अक्षय कुमार, आमीर खान, नसरुद्दीन शहा, मनोज वाजपेयी यांच्याशी विद्यार्थ्यांना संवाद साधता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी रॉक बॅण्ड स्पर्धा, डान्स स्पर्धा, फेस पेंटिंग स्पर्धा, टाकाऊपासून उत्कृष्ट वस्त्रे बनवण्याची ट्रॅशन स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, देसी बिट्‌स, जस्ट अ मिनिट्‌स, संस्कृती अशा विविध स्पर्धांचे या वेळी आयोजन करण्यात येणार आहे.

अनेक विक्रमांची नोंद
१९७१ मध्ये मूड इंडिगोला प्रारंभ झाला तेव्हापासून या फेस्टमध्ये अनेक जागतिक विक्रम करण्यात आले आहेत. २०१३ च्या फेस्टिव्हलमध्ये सर्वाधिक नागरिकांनी ओरियो बिस्कीट चहामध्ये बुडवून खाल्ले होते; तर २०१६ मध्ये जगातील सर्वात मोठे जमिनीवरील थ्रीडी चित्र काढण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT